Share

‘एखाद्या व्हायरसप्रमाणे आपला राजकिय रंग बदलणाऱ्या पडळकरांनी तारतम्य बाळगावे’

Published On: 

पुणे : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सावधान : चीनी हॅकर्सच्या कोविड ईमेलपासून सावध राहण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे. अस पडळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, एखाद्या व्हायरसप्रमाणे आपला राजकिय रंग बदलणे पडळकरांचा गुणधर्म आहे. फक्त पोपटपंची करण्याव्यतिरिक्त स्वतःचे असे कुठलेही कर्तृत्व नसलेल्या गोपीचंद पडळकर यांनी अवघ्या महाराष्ट्राने स्वीकारलेल्या नेतृत्वावर, आमच्या आदरणीय शरद पवार साहेबांवर टीका करणे योग्य नाही. तारतम्य बाळगा. अस राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पडळकर यांना सुनावलं आहे.

शरद पवारांच्या पायाच्या धुळीची लायकी नसलेल्या माणसाने त्यांच्यावर टीका करावी हे हसण्यासारखं आहे. केवळ प्रसिद्धीच्या वर्तुळात राहण्याचा हा असहाय्य प्रयत्न आहे. शरद पवारांबद्दल बोलण्याची लायकी आहे का त्यांची. जो माणूस कालपर्यंत मोदींना शिव्या देत होता, त्यांच्याकडूनच उमेदवारी घेतो. भाजपात जाऊन बहुजनांच्या गोष्टी आम्हाला शिकवताय. अशी जोरदार टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

“असे अनेक गोपीचंद महाराष्ट्रात झाले आहेत. पवारांच्या उंचीलाही ते स्पर्श करु शकत नाहीत. शरद पवारांवर बोलताना जी भाषा वापरली आहे त्याचा मी तीव्र निषेध करतो. त्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल,” असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. “सहा-आठ महिन्यापूर्वी गोपीचंद पडळकर राष्ट्रवादीचे दरवाजे ठोठावत होते. मला घ्या अशी विनंती करत होते,” असा गौप्यस्फोटही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला.

मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी भक्कम तयारी – मंत्री अशोक चव्हाण

राजकारणात नेम आणि फेम मिळवायचे असले की शरद पवार साहेबांवर टीका करायची हे समजून अनेकजण उचलली जीभ लावली टाळ्याला या उचापती करतात. सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता डिपॉझिट, अस्तित्व टिकून राहील, देवांच्या खोट्या शपथा घ्याव्या लागणार नाही, हे पहावे. बिरोबा यांना सद्बुद्धी देवो ! अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर केली आहे. तर, मंडल आयोग,नामविस्तार, बहुजनांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवून शरद पवार साहेबांनी आम्हा बहुजनांच्या आयुष्याचं सोनं केलं हे महाराष्ट्राला वेगळे सांगण्याची गरज नाही. पण भाजपने दिलेल्या आमदारकीची परतफेड करण्यासाठी गोपीचंद पडळकर यांना वायफळ गोष्टी कराव्या लागतात हे वाईट वाटतं. अस देखील धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी हे पवारांच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. ‘मी देखील अनेक वर्षे पवारांचा विरोधक होतो, पण विरोध हा वैचारिक असा वयक्तिक नाही. त्यामुळे मी देखील पवारांवर वयक्तिक टीका केली नाही.’ अस राजू शेट्टी म्हणाले आहेत. तर गोपीचंद पडळकर यांनी आधी राजकीय सभ्यता शिकावी आणि मग बोलावे. अस राजू शेट्टी यांनी पडळकर यांना सुनावलं आहे.

दुसरीकडे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी गोपीचंद पडळकर यांचा खरपूस समाचार घेतला आहे. महाबुध्दीवान… महानिष्ठावान… पक्ष बदलण्याचा अनुभव असलेले गोपीचंद पडळकर हे सडक्या मानसिकतेचा कीडा आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. ‘पडळकर हे ज्या पक्षातून येतात त्यांची विचारधाराच जहरी आहे. ज्याच बारामतीत डिपॉजिट जप्त झालं त्याने पवारांविषयी बोलूच नये. पडळकर यांनी बहुजनाच्या अन्यायाविषयी बोलू नये. पवार साहेबांनी माझ्या सारख्या अति वंचित मुलाला आमदारकी दिली आहे त्यामुळे त्याचं बहुजनाविषयी योगदान अधोरेखित होत’. अस अमोल मिटकरी म्हणाले आहेत. इतकच नाही तर पडळकरांच हे वक्तव्य अत्यंत बालिश असून फडणवीसांनी माकडाच्या हातात कोलीत दिल असल्याची टीका मिटकरी यांनी केली आहे.

पोंक्षे राष्ट्रवादीच्या स्टेजवर; ’आप’ने दिली आंबेडकरांचा आणि गांधीजींचा अवमान केल्याची आठवण करून

गोपीचंद पडळकर यांच्या जहरी टीकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुणे राष्ट्रवादी काँग्रेसने उद्या आंदोलनाची हाक दिली आहे. गोपीचंद पडळकर यांनी शरदराव पवार यांच्याबाबत अतिशय अश्लाघ्य भाषेत वक्तव्य केले आहे. राजकारणात मतभेद असू शकतात, मात्र एखाद्या व्यक्तीबद्दल इतक्या खालच्या पातळीवर येऊन असे वक्तव्य करणे, भारतीय जनता पक्षाच्या संस्कृतीला शोभते का असा सवाल, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी विचारला.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गुरुवारी सकाळी 10 वाजता लोकमान्य टिळक पुतळा, मंडई येथे आंदोलन करणार आहेत, अशी माहिती अंकुश काकडे यांनी दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!