सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्य्या निकटवर्तीयांवर काल आयकर विभागाच्या पथकांनी छापे टाकले. या छाप्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सोलापुरात तुफान बॅटिंग केली. अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर पडलेल्या छाप्यांवर बोलताना शरद पवारांनी त्यांना सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) पाठवलेल्या नोटिशीची आठवण सांगितली आहे.
‘विधानसभा निवडणुकीआधी मला बँकेसंदर्भात ईडीची नोटीस आली होती. मी त्या बँकेचा सभासदही नव्हतो, ना त्या बँकेकडून मी कधी कर्ज घेतलं होतं. त्यानंतर काय झालं, ते सगळ्यांनी पाहिलं. मला ईडीची नोटीस दिली आणि सबंध महाराष्ट्रानं भाजपला येडी ठरवलं’, अशा शब्दांत शरद पवार यांनी भाजपवर शरसंधान साधलं आहे.
भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. सत्ता लोकहितासाठी राबवायची असते. पण भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. देशातील जनता हे सगळं पाहतेय. ही जनताच भाजपला धडा शिकवेल, अजित पवारांच्या घरी पाहुणे येऊन गेले. पण पाहुण्यांची चिंता आपल्याला अजिबात वाटत नाही, असा टोला पवारांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- साखरेच्या नावावर महाराष्ट्राला लुटलं, तिच साखर पवार कुटुंबाला संपवणार; राणेंचा घणाघात
- लवकरचं ‘दूध का दूध पानी का पानी होईल; अजितदादांची प्रतिक्रिया
- ज्यांच्या हाती देशाची सत्ता त्यांना शेतकऱ्यांबद्दल आस्थाच नाही- शरद पवार
- ‘लखीमपुर घटनेवर मी प्रतिक्रिया दिली या रागातून सत्ताधाऱ्यांनी ‘ती’ कारवाई केली असावी’
- १०५ आमदार असूनही ते एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काम करतात; राऊतांनी फडणवीसांना डिवचलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

