🕒 1 min read
पुणे : गेल्या काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस चांगल्याच चर्चेत आहेत. शिवसेनेवर मार्मिक आघात करणाऱ्या अमृता फडणवीस शिवसैनिकांच्या रडारवर आहेत. नुकतीच त्यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची तुलना रेशमी किड्या सोबत केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर शिवसेनेचे जेष्ठ नेते किशोर तिवारी यांनी थेट संघाला पत्र लिहित अमृता फडणवीस यांना आवरण्याचे आवाहन केले होते.
दरम्यान,शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे . रश्मी ठाकरे यांच्यावर महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.अमृता फडणवीस यांनी देखील रश्मी ठाकरे याचे अभिनंदन केले आहे .
अमृता फडणवीस म्हणतात,सामनाच्या संपादकपदी विराजमान झाल्याबद्दल रश्मी ठाकरे तुमचं अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.आपल्या देशात अधिकाधिक महीलांनी उच्च पदावर जाऊन महिला , समाजातील महत्वाचे विषय याच्यावर बोलण्याची गरज आहे . यासाठी समाजिक हीताच्या महत्वाच्या मुद्दयांवर मत मांडण्याचं व्यासपीठ महीलांना उपलब्ध व्हावं’
Congratulations & best wishes to Smt #RashmiThackeray for being appointed as new Editor of #Saamana !Our country needs more women in top leadership positions to represent the issues of women & society & also have a platform to voice their opinions in matters of public importance!
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 1, 2020
दरम्यान, रश्मी ठाकरे यांच्या या नियुक्तीसह त्यांना सामनाच्या पहिल्या महिला संपादक होण्याचा सन्मान मिळाला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी ‘सामना’ दैनिकाचं संपादकपद सोडलं होतं. त्यानंतर ही जबाबदारी कुणाकडे दिली जाणार याविषयी बरीच उत्सुकता होती. रश्मी ठाकरे यांच्या निवडीनंतर या पदावर ठाकरे कुटुंबातीलच व्यक्ती असणार हे आता स्पष्ट झालं आहे.एका बाजूला रश्मी ठाकरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना शिवसेनेचे धडाकेबाज नेते आणि सामनाचे माजी संपादक संजय राऊत यांना मात्र ट्रोल केले जात आहे.
https://twitter.com/AbhishekSaket/status/1234050629431021568?s=20
https://twitter.com/reshoe_/status/1234064121940848640?s=20
https://twitter.com/vks_up/status/1234076440049545216?s=20
Sanjay Raut to Uddhav Thakre#Saamana #sanjayraut
Rashmi ThakreSanjay Raut pic.twitter.com/q5rVUl72Se
— Baba (@bhaveshkjha) March 1, 2020
https://twitter.com/SARCASTIC_PI/status/1234086143538257926?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

