मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच काही न काही कारणामुळे चर्चेत असतात. मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अमृता फडणवीस यांच्यातील वाद चांगलाच चिघळला होता. त्यात अमृता फडणवीस यांच्या गायनाची प्रचीती सर्वांनाच आहे. नुकतीच त्यांनी आता ट्वीटरवर एक पोस्ट केली आहे. त्यात दिलेल्या कॅप्शनमधील मजकुरामुळे हे ट्वीट चर्चेत आलं आहे.
अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये एक योगासन करताना त्या दिसत आहेत. हिरवळीवर योगासन करतानाचा त्यांचा हा फोटो व्हायरल होऊ लागला आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “जगाची चुकीची बाजू वर आहे. ते उलट्याबाजूने फिरवण्याची गरज आहे. असं केल्यास जगाची योग्य बाजू वर येईल”, अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं आहे.
The world is wrong side up ! It needs to be turned upside down, in order to be right side up !#thursdayvibes #ThursdayThought pic.twitter.com/Djy7Jl3r0s
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 6, 2022
आता या पोस्टनंतर त्याला बऱ्याच प्रतिक्रियादेखील समाज माध्यमावर उमटत आहेत. काहींनी आपण असं आसन करूच शकत नाही. अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान गणपतीच्या मुहूर्तावर अमृता फडणवीस यांचं एक नवीन गाणं रिलीज झालं होतं. ‘गणेश वंदना’ असं या अल्बमचं नाव आहे. हे गाणे त्यावेळी प्रचंड पसंत केले होते.
महत्वाच्या बातम्या –
- मोदींची सभा रद्द होण्यामागे सुरक्षेत चूक की सभेतील मोकळ्या खुर्च्या?; राष्ट्रवादीचा सवाल
- राजकीय लोकांना कोरोना होत नाही का?, नियम फक्त सामान्यांनाच का?
- कोरोना रुग्णसंख्या वाढल्यानंतर शरद पवार मैदानात, आज महत्वाची बैठक
- राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता पोलीसही करू शकणार वर्क फ्रॉम होम
- पंतप्रधानांच्या सुरक्षेत गंभीर चूक; नवाब मलिकांची प्रतिक्रिया

