Share

Amruta Fadanvis | आम्ही ब्राह्मण आहोत याचा आम्हाला गर्व – अमृता फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

Amruta Fadanvis | नाशिक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस  (Amruta Fadanvis) सोमवारी नाशिकच्या दौऱ्यावर होत्या. बालदिनाच्या निमित्ताने त्यांनी नाशिक शहरातील विविध कार्यक्रमांना भेटी दिल्या. त्याच दरम्यान ब्राह्मण महासंघाच्या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी एक विधान केलंय. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

“आम्ही ब्राह्मण आहोत आणि आम्हाला याचा गर्व आहे. आम्ही बुद्धीजीवी आहोत याचा आम्हाला गर्व आहे. आम्ही स्वाभिमानी आहोत याचा आम्हाला गर्व आहे, पण आम्हाला स्वतःचं मार्केटिंग करता येत नाही. ही आमच्यात कमतरता नाही, पण आम्ही असं करत नाही. आमची ती महानता तशीच दिसून येते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना न मागता मुख्यमंत्री पद दिलं होतं”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

त्यांनी कधीच हे पद मागितलं नसल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला. “देवेंद्र फडणवीसांची कार्यपद्धती, त्यांची लोकसेवा पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि वरच्यांनी त्यांना मुख्यमंत्री बनवलं,” असं अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी म्हटलं. पुढील काळात ब्राह्मण महासंघापुढील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू असं आश्वासन देखील अमृता फडणवीस यांनी दिलंय.

दरम्यान, नाशिकमध्ये अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघ नाशिकच्या वतीने दीपावली स्नेहमिलन हा अमृता फडणवीस यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे इत्यादीही उपस्थित होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!