🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता रंग चढताना दिसत आहे. प्रमुख पक्षांचे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरल्याचं चित्र काल पाहायला मिळालं. भाजपा नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल धुळे आणि नाशिक जिल्ह्यात पाच ते सहा जाहीर सभा घेतल्या.
धुळे जिल्ह्यात शिरपूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत काँग्रेसचे नेते अमरिश पटेल यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनीही काल भाजपामध्ये प्रवेश घेतला.
शहादा इथं झालेल्या सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी, राज्यातल्या प्रलंबित वनहक्क कायद्याअतर्गत जमिनीचे दावे वर्षभरात मार्गी लावून आदिवासींना वनजमीनी देण्याचं आश्वासन दिलं. या सभेतही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ राष्ट्रवादीतून शिवसेनेत जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेनेने येवल्यातून संभाजी पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र धक्कादायक बाब अशी की, आता राष्ट्रवादीचे सरचिटणीस माणिकराव शिंदे यांनी संभाजी पवार यांच्याशी हातमिळवणी केली असून आपण शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
हदगाव विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे निष्ठावंत तथा एडव्होकेट राजीव सातव यांचे खंदे समर्थक तथा नांदेड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर यांनी मुंबई येथे जाऊन बुधवार 9 ऑक्टोबर रोजी सकाळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182207087599738881?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182206870997458944?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
