Share

हातात पिस्तूल घेऊन हवा करत व्हिडीओ शूट करणारा पोलीस निलंबित

Published On: 

अमरावती : अमरावती जिल्ह्याच्या चांदूरबाजार येथील पोलिस महेश मुरलीधर काळे यांनी शासकीय गणवेशामध्ये शस्त्राचा वापर करून व्हिडीओ तयार केला. सदरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. शासकीय गणवेशाचा आणि शस्त्राचा गैर उपयोग केल्याचे बेशिस्त आणि बेजबाबदार वर्तनाबदल पोलिस अंमलदार महेश काळे यांना पोलिस अधीक्षक डॉ हरि बालाजी अमरावती ग्रामीण यांनी निलंबित केले आहे. परवा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि काल सायंकाळी पोलीस अधीक्षक यांनी कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार हा पोलीस गणवेशामध्ये हातात पिस्तूल घेऊन या कर्मचाऱ्याने एका व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत हा पोलीस कर्मचारी एक डायलॉग मारतो आणि नंतर पिस्तूल दाखवताना दिसत आहे. आपली डायलॉगबाजी झाल्यानंतर हा कर्मचारी मोटरसायकलवरुन उठून पुढे चालू लागतो आणि व्हिडीओ संपतो. हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यानंतर पोलीस खात्याने या व्हिडीओची दखल घेतली आहे.

ड्युटीवर असतानाच शासकीय गणवेश आणि शस्त्राचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत या कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे. या कारवाईमुळे या डायलॉगबाजीने पोलीस कर्मचाऱ्याच्या नोकरीवर गदा आणल्याचं चित्र दिसत आहे. हा व्हिडीओ अमरावतीमधील चांदूरबाजार येथील पोलीस कर्मचाऱ्याचा असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामध्ये सध्या तरी या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं असून या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे समजते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!