टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करत आहेत. मात्र आता या पक्षांतराच्या अफवा देखील उठत आहेत. अशीच एक अफवा उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या बाबतीत उठली आहे. राणा जगजितसिंह आता लवकरचं भाजपमध्ये जाणार आहेत, अशी वार्ता आली होती. मात्र ही वार्ता खोटी असून राणा जगजितसिंह राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्येच राहणार असल्याची माहिती, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
ते सतार येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अजित पवार म्हणाले की, राणा पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत. मात्र, या बातम्याच असून तसे काहीही नाही. एखाद्या आमदाराने उमेदवारीसाठी अर्ज भरला नाही म्हणजे ते पक्षासोबत नाहीत, असा अर्थ काढू नका, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे.
दरम्यान साताऱ्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याबाबत देखील अशीच अफवा उठली आहे. याबाबत देखील अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मागील काही काळामध्ये मलासुद्धा विधानसभा निवडणुकीत पक्षाकडे अर्ज सादर करता आला नव्हता. त्यामुळे केवळ पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केला नाही यावरून अफवा उठवू नका, असे अजित पवार म्हणाले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

