टीम महाराष्ट्र देशा – आज जगभरात हिंदू धर्मीय होळीचा सण साजरा करत आहेत. राज्यातील आणि देशातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जनतेला होळीच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांनी जनतेला रंगांच्या या सणाच्या शुभेच्छा देताना दुष्ट शक्तींचा आणि वाईट विचारांचा नाश होवो अशीही इच्छा व्यक्त केली आहे.
या बरोबरच काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस
अमोल मिटकरी यांनी विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर निशाणा साधला आहे.
अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत भाजपवर टीका केलीय. ते म्हणाले, ‘आज होळी.. होळीत विरोधकांनी आपला अहंकार व सत्तेचा अवास्तव माज जाळायला पाहिजे. वाईट विचार, दुसऱ्याच्या बाबतीत असंवेदना, व डोक्यात सत्तेची हवा ह्या निरर्थक बाबी होळीत जाळून उज्वल महाराष्ट्र घडवायला सहकार्य करायला पाहिजे. हीच खरी होळी.’
..आज होळी.. होळीत विरोधकांनी आपला अहंकार व सत्तेचा अवास्तव माज जाळायला पाहिजे. वाईट विचार, दुसऱ्याच्या बाबतीत असंवेदना, व डोक्यात सत्तेची हवा ह्या निरर्थक बाबी होळीत जाळून उज्वल महाराष्ट्र घडवायला सहकार्य करायला पाहिजे. हीच खरी होळी. @AjitPawarSpeaks
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 9, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

