Share

Amol mitkari on Devendra fadnavis : “मी पुन्हा येइल पण ‘उपमुख्यमंत्री’ म्हणून…” ; अमोल मिटकरींचा फडणवीसांना टोमणा

Published On: 

मुंबई : अनेक दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर अखेर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आहेत. याआधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या बातम्या येत होत्या, मात्र यावेळी सर्वच अंदाज फेल ठरले. त्यामुळे शिंदे यांना सत्तेची खरी चावी मिळाली आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.

“मी पुन्हा येइल पण ‘उपमुख्यमंत्री’ म्हणून हे आता राज्यातील जनतेला नव्याने कळलय”, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केली.

एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत-

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदेंवर हल्ला चढवला. राजीनामा दिल्यानंतर आज पहिल्यांदाच मीडियासमोर आले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्याचे बोलले जात आहे, ते चुकीचे आहे. शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत. सत्तेसाठी रातोरात खेळ खेळला गेला. तसेच पर्यावरण बिघडवणारे कोणतेही काम करू नका, असे आवाहन देखील त्यांनी सरकारला केले.

आपण ज्याला मतदान करतो त्याला परत बोलावण्याचा अधिकार प्रत्येक मतदाराला असला पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. माझ्या पाठीवर कसा खंजीर खुपसला हे सर्वांनी पाहिले. भाजपने मला दिलेले आश्वासन पूर्ण केले असते तर किमान अडीच वर्षे त्यांचा स्वत:चा मुख्यमंत्री झाला असता. महाराष्ट्रात सर्व काही आधीच ठरलेले होते. मात्र महाराष्ट्रातील जनतेचा मी ऋणी आहे. मला वचन द्यायचे आहे की सत्तेसाठी मी कधीही विश्वासघात करणार नाही. सत्ता येते आणि जाते, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!