अकोला : अकोल्यातील नवी तिलई हे गाव गेल्या अडीच वर्षांपासून अंधारात होते. अडीच वर्षांपूर्वी मेळघाटातील लोकांचे याठिकाणी पुनर्वसन करण्यात आले खरे पण, वीज, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण अशा पायाभूत सुविधांपासून हे गाव वंचितच राहिले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी हे गाव दत्तक घेतले आणि तब्बल अडीच वर्षांनंतर आपल्या प्रयत्नांनी या गावात वीज आणली. एखादा दिवाळीचा उत्सवच जणू आहे अशा आनंदात नवी तिलई गावातील लोक सध्या आहेत. आमदार अमोल मिटकरी यांच्याबद्दल त्यांच्या मनात कृतज्ञतेची भावना आहे.
दिवसभर काम करून रात्री सोलर लाईट किंवा मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करावा लागायचा. पण, आता वीज आल्याने मन लावून अभ्यास करता येणार आहे, अशी प्रतिक्रिया गावातील एका विद्यार्थिनीने दिली आहे. तर आपल्या वाढदिवशी घरात जसे आनंदाचे वातावरण असते, तसाच आनंद वीज आल्याने आपल्या घरात असल्याची प्रतिक्रिया गावातील नंदा ठाकरे या महिलेने व्यक्त केली आहे.
मराठा समाजाच्या दृष्टीने काळा दिवस, सरकारचा नाकर्तेपणा भोवला – विनायक मेटे
नवी तिलई गावात पुनर्वसन झाल्यापासून येथील लोकांना वीज, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण अशा पायाभूत सुविधाही मिळालेल्या नाहीत. गावकऱ्यांकडे साधे रेशनकार्डही नाही. पण, आता या गावाचा विकास करण्याचे आपले ध्येय असल्याचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. गावात चांगले रस्ते, आरोग्यविषयक सुविधा तसेच शिक्षणाच्या सुविधा आणणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पवार साहेब आता कोणाच ऐकणार नाहीत, म्हणून मी लोकांनाच विनंती करतो – रोहित पवार


