पुणे : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. त्यामुळे राज्याला अडचणीत पाहून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे पायाला भिंगरी लावत महाराष्ट्रभर दौरे करत उपाययोजनांचा आढावा घेत आहेत. सोलापूर आणि नाशिक नंतर पवारांची स्वारी औरंगाबादला रवाना झाली होती. मात्र शरद पवारांच्या या फिरण्याचा त्यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांना काळजी लागली आहे.
मी लोकांमध्ये रमणारा माणूस आहे. राज्य व देशावर जेव्हा संकट येते तेव्हा मला बसवले जात नाही. संकटाच्या काळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मी फिरत असतो. अस उत्तर शरद पवार यांनी औरंगाबाद मध्ये दिल होत. यावरून आता शरद पवारांनी ट्विट करत आपल्या आजोबांची काळजी करत जनतेला आवाहन केले आहे.
‘लोकांच्या हितासाठी आदरणीय शरद पवार साहेब तुम्ही राज्यभर फिरतच राहणार. याबाबत कुणीही नाही म्हणलं तरी तुम्ही ते ऐकणार नाही. म्हणून मी लोकांनाच कळकळीची विनंती करतो की, साहेबांच्या दौऱ्यात त्यांना भेटत असताना स्वतःहूनच योग्य ते अंतर ठेवण्याची काळजी घ्यावी’ अस आवाहन रोहित पवार यांनी केले आहे.
लोकांच्या हितासाठी आदरणीय @PawarSpeaks साहेब तुम्ही राज्यभर फिरतच राहणार.
याबाबत कुणीही नाही म्हणलं तरी तुम्ही ते ऐकणार नाही.
म्हणून मी लोकांनाच कळकळीची विनंती करतो की, साहेबांच्या दौऱ्यात त्यांना भेटत असताना स्वतःहूनच योग्य ते अंतर ठेवण्याची काळजी घ्यावी.???? pic.twitter.com/z0qDbBgFAd
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 27, 2020
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

