Share

“…प्रकरणात अजून फडणवीसांनी उडी कशी मारली नाही?”, संजय राऊतांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून राज्यात चांगलेच राजकारण रंगले आहे. शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष पहावयास मिळत आहे. या पार्श्वभूमीवरच शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut)यांनी थेट भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्यावर निशाणा साधला आहे.

कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप उडी कशी मारली नाही? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता, पण फडणवीस यांनी लोकांची निराशा केली नाही. त्यांनी या विषयावर आपली क्रांतिकारक मते मांडली आहेत. आधी पाठिंबा द्यायचा आणि नंतर तो काढून घ्यायचा अशा पद्धतीने संभाजीराजे यांची ठरवून कोंडी केली असे फडणवीस बोलू लागले आहेत. फडणवीसांची वक्तव्ये आता कोणी गांभीर्याने घेत नाहीत. शब्द द्यायचा व नंतर वेळ येताच मोडायचा हे भाजपालाच चांगले जमते. २०१४ आणि २०१९ साली महाराष्ट्रात जे शब्द फिरवण्याचे खेळ झाले, त्याचा अनुभव गाठीशी असलेले फडणवीस इतरांच्या शब्दमोडीवर प्रश्न विचारतात हे आश्चर्यच आहे. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत भाजपा नेतृत्वाने दिलेला शब्द कसा मोडला हे संपूर्ण देश जाणतो. पंचवीस वर्षांच्या युतीनंतरही शब्द मोडणाऱ्यांनी याबाबत प्रवचने झोडावीत यास काय म्हणायचे! कोंडी झाली म्हणजे काय हे आधी फडणवीस यांनी ‘मराठी शब्दरत्नाकरा’चा अभ्यास करून समजून घेतले पाहिजे. २०१९ साली ‘‘मी पुन्हा येईन’’ असे सांगणाऱ्या फडणवीसांना पुन्हा येताच आले नाही. तेव्हापासून सुरू झालेली स्वतःची कोंडी त्यांना फोडता आलेली नाही. अफझलखानाने प्रतापगडावर शिवरायांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, पण महाराजांनी अफझलखानाच्या पोटातच वाघनखे खुपसून कोंडी फोडली. पन्हाळगडाला मोगलांनी वेढा घालून महाराजांची कोंडी केली, पण महाराज कोंडी फोडून बाहेर पडले. औरंगजेबाच्या आग्र्याच्या दरबारातही महाराजांची कोंडी झाली. महाराज ती कोंडी फोडून पेटाऱ्यातून निसटले. त्यामुळे फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे कोंडी झाली ती कशी हे समजायला मार्ग नाही. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!