🕒 1 min read
मुंबई: देशाचा पुढील राष्ट्रपती कोण होणार यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षाने यशवंत सिन्हा (Yashwant Sinha ) यांना राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी दिली आहे तर भाजपच्या अर्थातच एनडीएकडून आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना तसेच इतर अनेक पक्षांनी द्रौपदी यांना पाठींबा दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मात्र यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून माघार घ्यावी, अशी मागणी केली आहे.
“यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याची विनंती करत आहे कारण, अनेक अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे सदस्य मॅडम द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी सामील होत आहेत.”, असे ट्वीट प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
Requesting Mr. Yeshwant Sinha to withdraw from the Presidential race because many Scheduled Caste and Scheduled Tribe members from across the parties are joining to vote in favour of Madam Draupadi Murmu. @YashwantSinha
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 16, 2022
उद्धव ठाकरेंचा मुर्मू यांना पाठींबा-
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मुंबईतील दादर येथील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी (राष्ट्रपती निवडणूक) पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली. यासाठी शिवसेनेच्या खासदारांनी किंवा अन्य कोणीही आपल्यावर कोणताही दबाव टाकला नसल्याचेही ते म्हणाले. शिवसेना खासदारांच्या विनंतीला मान देऊन हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
द्रौपदी मुर्मू यांनी सांगितला ‘तो’ किस्सा-
एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी त्यांना मिळालेल्या उमेदवारीबद्दलचा किस्सा सांगितला आहे. राष्ट्रपतीपदासाठी येत्या १८ जुलैला निवडणूक होणार आहे. द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी घोषणा केली.
“ज्यांना स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर ही संधी मिळाली नाही, ज्यांना आपण या टप्प्यावर पोहोचू असं कधीच वाटलं नव्हतं. ते आता अत्यंत आनंदी आहेत. २१ जूनला माझी उमेदवारी जाहीर करण्याच्या अवघ्या १५ मिनिटांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला फोन करून माहिती दिली.”, असा खुलासा राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी केला आहे.
दरम्यान विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला मतदान होणार असून द्रौपदी मुर्मू यांनी ही निवडणूक का लढवत आहोत, यामागील खुलासा केला आहे. “मी हे काम योग्य प्रकारे करू शकेन का? यावर मोदींनी म्हटले, की आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत आणि तुम्हाला हे करायचं आहे. आणि याक्षणी मी हो म्हटलं.”
महत्वाच्या बातम्या:
- Sambhajinagar : टाटाचे पहिले पाऊल! क्रोमा वर आता औरंगाबाद नव्हे तर ‘संभाजीनगर’
- Vijay Shivtare on Sanjay Raut | “वैद्यकीय क्षेत्रात स्किझोफ्रेनिया नावाचा एक रोग…” ; विजय शिवतारेंचा संजय राऊतांवर घणाघात
- Vijay Salvi | “उद्धव ठाकरे यांच्या समोरच एकनाथ शिंदेंचा फोन आला होता, मात्र…”; विजय साळवींचा खुलासा
- Vijay Shivtare : “तुम्ही काय माझी हाकलपट्टी करणार मीच…”, विजय शिवतारेंचा शिवसेनेला टोला
- Uddhav Thackeray | पालघर जिल्ह्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष शिंदे गटात सामील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
