🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर या आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायमच चर्चेत असतात. आताही त्यांनी एका कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले आहे. मी नाले, गटारं साफ करण्यासाठी खासदार झाले नाही अस साध्वी म्हणाल्या आहेत.
मध्यप्रदेशातील सीहोर येथे आज एका सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात स्वच्छतेविषयी प्रश्नाला उत्तर देताना ‘आम्ही गटारं साफ करण्यासाठी नाही आहोत. ठीक आहे ना? आम्ही तुमचं शौचालय स्वच्छ करण्यासाठी अजिबातच नाही निवडून आलो. आम्ही जे काम करण्यासाठी निवडलो गेलो आहोत, ते काम आम्ही इमानदारीने करु. असं आम्ही पूर्वीही म्हणत होतो. आजही त्यावर ठाम आहोत आणि उद्याही आमचं म्हणणं तेच असेल’ असा साध्वी प्रज्ञा सिंग म्हणाल्या आहेत.
#WATCH BJP MP from Bhopal, Pragya Thakur in Sehore: Hum naali saaf karwane ke liye nahi bane hain. Hum aapka shauchalaya saaf karne ke liye bilkul nahi banaye gaye hain. Hum jis kaam ke liye banaye gaye hain, vo kaam hum imaandaari se karenge. #MadhyaPradesh pic.twitter.com/VT4pcGKkYx
— ANI (@ANI) July 21, 2019
दरम्यान, निवडणुकीपूर्वीही त्यांनी नथुराम गोडसे देशभक्त होते, आहेत, आणि राहतील. जे त्यांना दहशतवादी म्हणत आहे. त्यांनी आधी स्वतःला तपासावे. या निवडणुकीत नथुराम यांना दहशतवादी म्हणणाऱ्यांना जनता उत्तर देईल अस विधान केले होते. त्यावरूनही त्या चर्चेत आल्या होत्या.

