Share

IND vs AUS | हरमनप्रीत कौरनंतर स्मृती मंधानाने केली ‘ही’ कामगिरी

Published On: 

🕒 1 min read

IND vs AUS | मुंबई: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) महिला क्रिकेट संघामध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना मुंबईतील डी. वाय. पाटील मैदानावर पार पडला. या सामन्यांमध्ये भारतीय संघाने शानदार विजय मिळवला. या सामन्यामध्ये झालेल्या सुपर ओवरमध्ये भारतीय संघाने 4 धावांनी विजय मिळवला. या सामन्यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू स्मृती मंधाना (Smriti Mandhana) ने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचबरोबर या सामन्यामध्ये उत्कृष्ट खेळी खेळत स्मृतीने आपल्या नावावर एक अनोखा विक्रम केला आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2500 पेक्षा अधिक धावा करणारे स्मृती मंधाना दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. स्मृतीच्या आधी हा पराक्रम हरमनप्रीत कौरच्या नावावर होता. हरमनप्रीत कौरने भारतीय संघासाठी 149 सामन्यांतील 125 गावांमध्ये 27.36 च्या सरासरीने 2736 धावा केलेले आहेत. तर स्मृतीने 104 व्या सामन्यातील 100 व्या डावामध्ये ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तिने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 2544 धावा नोंदवले आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 सामन्यामध्ये स्मृतीने आपल्या बॅटने जोरदार कामगिरी केली आहे. या सामन्याला सुरुवात होताच स्मृतीने 49 चेंडूमध्ये 161.62 च्या स्ट्राइक रेटने 69 धावांची खेळी खेळली. या खेळीमध्ये स्मृतीने 9 चौकार आणि 4 षटकार मारले.

भारतीय महिला क्रिकेट संघासाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे होते. हा सामना जिंकून भारतीय महिला संघाने या मालिकेमध्ये फक्त आपले स्थान उंचावले नाही, तर भारतीय महिला क्रिकेटसाठी हा सामना खास सामना होता. येणाऱ्या काळामध्ये भारतीय महिला क्रिकेटचे चित्र बदलणार असून त्याची झलक भारतीय महिला क्रिकेट खेळाडूंनी या सामन्यात दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!