Share

शाळेच्या फीबाबत पालकांना दिलासा देण्यासाठी अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र ; पत्र पाठवून केली ‘ही’ मागणी

Published On: 

मुंबई : जगात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यानंतर सुरु झालेल्या लॉकडाऊनचा खूप मोठा परिणाम हा शैक्षणिक क्षेत्राला बसला. शालेय फी दरवाढी बाबतीत यापूर्वीच राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने ८ मे २०२० च्या शासन निर्णयाद्वारे तीन महत्वाच्या बाबी स्पष्ट केल्या होत्या. यात पालकांना फी मासिक, त्रैमासिक जमा करण्याचा पर्याय द्यावा, फी वाढ करु नये, शक्य झाल्यास पालकांच्या कार्यकारी समितीमध्ये ठराव करुन योग्य प्रमाणात फी कमी करावी. शिक्षण विभागाचा हा आदेश सर्व बोर्डाच्या, सर्व माध्यमाच्या शाळांसाठी लागू होणे अपेक्षित होते. तसं त्यात नमूदही केलं होतं. पण या सरकारी आदेशाची अंमलबजावणी प्रत्यक्षात तसं झालेलं नाही.

शासनाच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केलं जात आहे याबद्दल मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं आहे. या पत्रात अमित ठाकरेंनी नमूद केले आहे की, “कोरोना संकटकाळात शाळांनी, विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या- आयसीएसई, सीबीएसई, आयबी बोर्डाच्या शाळांनी फी भरण्यात पालकांना येणाऱ्या आर्थिक अडचणी समजून घ्यायला हव्यात. दुर्दैवाने, काही शाळा अपेक्षित समंजसपणा दाखवत नसून फी भरण्यासाठी पालकांवर दबाव टाकत आहेत. गेल्या आठवड्यात अशाच स्वरूपाच्या तक्रारी घेऊन काही पालक मला भेटूनही गेले. पालकांकडून शाळांनी वाढीव फी घेऊ नये तसंच फी भरण्यासाठी पालकांवर कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दबाव टाकला जाऊ नये, यासंदर्भात आपण स्वत: सर्व खासगी शाळांच्या व्यवस्थापनांशी संवाद साधून सध्याच्या संकटकाळात पालकांना दिलासा द्यावा.” अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

‘गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे अनेक पालकांच्या तक्रारी आल्या आहेत. कोरोना संकटकाळामुळे सर्वच स्तरांतील पालकांपुढे आर्थिक आव्हानं उभी आहेत. अशा काळात शाळांच्या व्यवस्थापनांनी समजूतदारपणे वागणं अपेक्षित होतं. पण काही शाळांनी विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकलं जाईल, ज्या पालकांकडे फी भरण्यासाठी पैसे नाहीत त्यांना प्रायव्हेट फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊन शाळेची फी भरा असं सांगण्यात येत आहे. हा सगळा प्रकार संतापजनक असून पालकांवर अन्याय करणारा आहे. अस अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान , ८ मेच्या निर्णयाविरोधात खासगी शाळा उच्च न्यायालयात गेल्यावर राज्य सरकारच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली. या पुढच्या सुनावणीत पालकांच्या बाजूने राज्य सरकारने ठामपणे उभे राहण्याची भूमिका घ्यावी असंही अमित ठाकरेंनी म्हटलं आहे.

अभिनेत्री इशा केसकर ‘या’ कारणामुळे सोडतेय ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका

अमित ठाकरेंची मागणी अजित पवारांनी केली मान्य, आशा सेविकांच मानधन वाढवणार

उद्धव ठाकरे हे फक्त मातोश्री पुरते मुख्यमंत्री, नारायण राणेंचा प्रहार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!