मुंबई : सद्या जगभर कोरोना महामारीने थैमान घातले आहे, त्यानंतर सुरु झालेल्या लॉकडाउनमुळे जवळपास तीन महिने मालिकांचं शूटिंग बंद होतं. मात्र आता काही अटीशर्तींचे पालन करत या शूटिंगला सुरुवात झाली आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेचंही शूटिंग सुरू आहे. या मालिकेतील शनाया अर्थात रसिकाने काही महिन्यांपूर्वी या मालिकेतून बाहेर पडली होती. तिच्या जागी इशा केसकरने शनायाची भूमिका साकारली होती. आता या मालिकेत पुन्हा एकदा रसिका सुनील शनायाच्या भूमिकेत परतणार असल्याचं कळतंय.
शनायाची भूमिका साकारणारी इशा केसकर ही का मालिका सोडतेय? चाहत्यांच्या या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी इशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे तिने मालिका सोडण्याचं कारण सांगितलं आहे.
लॉकडाऊन काळात मालिकेचे शूटींग बंद होते. यानंतर तीन महिन्यानंतर मालिकेचे शूटींग सुरु झाले. याच काळात इशाच्या दाढेचे ऑपरेशन झाले. दाढेचे ऑपरेशन झाल्यामुळे दिलेल्या शूटिंगच्या तारखांना हजर राहणे तिला शक्य होणार नव्हती. तिच्यामुहे मालिकेचे चित्रीकरण लांबवणेही शक्य नव्हते. अखेर तिला मालिका सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. अशी माहिती इशाने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ अपलोड करून दिली आहे.
या मालिकेत अभिजीत खांडकेकर, अनिता दाते यांच्या मुख्य भूमिका आहेत. नवरा बायकोच्या गोड संसारात जेव्हा नवऱ्यावर हक्क सांगणारी एखादी तिसरी व्यक्ती येते तेव्हा हक्काची बायको तिला नवऱ्यापासून दूर ढकलत तिचा तिरस्कार करते ? की संसारातील एक आव्हान म्हणून तिचा स्वीकार करते ? याची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत हि मालिका नव्या भागांसह प्रसारित होणार आहे.
राज्यातील हॉटेल सुरु करण्याबाबत लवकरच निर्णय, मुख्यमंत्र्यांचं मोठ पाऊल
महेंद्रसिंग धोनी… टाइगर अभी ज़िंदा है
सरकारचं ठरल ! ‘या’ तारखेला लागू शकतो १०वी आणि १२वी चा निकाल…

