Share

अमित ठाकरेंची मागणी अजित पवारांनी केली मान्य, आशा सेविकांच मानधन वाढवणार

Published On: 

मुंबई : ‘आशा’ स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करु, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांना दिलं आहे. अमित ठाकरे यांनी आज मंत्रालयात जाऊन अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकरदेखील होते

उद्धवा सजग तुझे सरकार ! फोन करून दिली थेट सुट्टी न घेतलेल्या अंध ‘कोविड योद्ध्याला’ शाबासकी

अमित ठाकरे, बाळा नांदगावकर आणि अजित पवार यांच्यात आज बैठक झाली. या बैठकीत ‘आशा’ स्वयंसेविकांच्या मानधनाबाबत चर्चा झाली. यावेळी अजित पवार यांनी अमित ठाकरेंची मागणी मान्य केली. त्यांनी अमित ठाकरे यांना ‘आशा’ स्वयंसेविकांच्या मानधनात दोन हजारांनी वाढ करु, असं आश्वासन दिलं. याशिवाय याबाबत लवकरच घोषणा करु, असंदेखील अजित पवार यांनी सांगितलं

दरम्यान यासाठी अमित ठाकरे यांनी अजित पवार यांना पत्र देखील लिहिले होते. परवा काही ‘आशा’ स्वयंसेविका मला भेटायला आल्या होत्या. आरोग्य सेवेच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना महिन्याला फक्त रु. १६०० मानधन मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात अशी स्थिती असताना इतर राज्यांत मात्र ‘आशां’ना दर महिन्याला रु. ४,००० ते १०,००० इतका मोबदला मिळत आहे. याकडे ठाकरे यांनी लक्ष वेढल आहे. आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी या स्वयंसेविका ‘आरोग्य सैनिक’ बनून, अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत असतात. विशेषत: कोविड संकटकाळात त्यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे. कामाचा मासिक मोबदला वाढवून मिळावा, ही त्यांची मागणी रास्त आहे. त्यांना ताठ मानेने आयुष्य जगता यावं, यासाठी त्यांना मिळणारा मोबदला त्वरित वाढवून देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिलं होत.

शरद पवार करणार नरेंद्र मोदींशी चर्चा, करणार ‘ही’ मोठी मागणी

केंद्राकडून ‘आशा’ स्वयंसेविका यांना सध्या दोन हजार रुपयांचे मानधन मिळत आहे. राज्याकडून त्यांना दोन हजार रुपये मिळाल्यास त्यांचे एकूण मानधन चार हजार होईल. काही दिवसांपूर्वी काही ‘आशा’ स्वयंसेविकांनी अमित ठाकरे यांची भेट घेतली होती. आरोग्य सेवेच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना महिन्याला फक्त दोन हजार रुपये मानधन मिळत असल्याची तक्रार त्यांनी अमित ठाकरे यांच्याकडे केली होती. याशिवाय त्यांनी सरकारकडून मानधन वाढवून मिळावं यासाठी अमित ठाकरे यांची मदत मागितली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!