Share

गेल्या २४ तासांत विक्रमी रुग्ण सापडले, अमित शहांनी घेतले सूत्र हाती; बोलावली तातडीची बैठक

Published On: 

नवी दिल्ली : कोरोना महामारीने देशात थैमान घातलं आहे. देशभरातमध्ये गेल्या २४ तासांत तब्बल ११९२९ नवे रुग्ण सापडले आहेत. तर ३११ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३२०९२२ वर गेला आहे. तर १४९३४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. १६२३७९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकूण ९१९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लॉकडाऊनमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रित असताना तो उठविल्यानंतर लगेचच याचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. कोरोनाच्या रुग्णांनी तीन लाखांचा आकडा पार केलेला असतानाच आजची आकडेवारी देशाला चिंतेत टाकणारी आहे. यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसह अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.

‘वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले’, संजय राऊतांच्या राज ठाकरेंना शुभेच्छा

दिल्लीतील गंभीर परिस्थितीमुळे गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उप राज्यपाल, उपमुख्यमंत्री अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संकटात असलेल्या राज्यांना केंद्राची तातडीची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाटून टाका म्हणणे सोपे आहे पण पैशाचे नाटक करता येत नाही – नितीन गडकरी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!