Share

वाटून टाका म्हणणे सोपे आहे पण पैशाचे नाटक करता येत नाही – नितीन गडकरी

Published On: 

मुंबई : आमच्या सरकारने स्थलांतरित मजुरांसाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. देशभर लोकांना अन्नधान्य वाटत करण्यात आले आहे. सर्व गोष्टीचं नाटक करता येते पण पैशाचे नाटक करता येत नाही. ज्यांना सर्वांना बरोबर घेऊन चालायचे आहे त्यांना विचारही करावा लागतो. वाटून टाका असे म्हणणे सोपे आहे. अस परखड वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी केले आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना गडकरी यांनी हे वक्तव्य केले आहे.

दरम्यान, पुन्हा लॉकडाऊनची शक्यता नाही. सरकारने याबाबत कोणतीही माहिती दिली नाही किंवा लॉक डाऊन होणार आहे की नाही याविषयी मला काही माहित नाही. ही अफवा आहे आणि अफवेवर कोणी विश्वास ठेऊ नये असे मला वाटते. अस देखील गडकरी म्हणाले आहेत.

…तरच सलून सुरु करण्याची परवानगी देणार – छगन भुजबळ

तर, आमच्या सरकारने स्थलांतरित मजुरांसाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. देशभर लोकांना अन्नधान्य वाटत करण्यात आले आहे. मनरेगा किंवा इतर काही योजना आहेत त्याचा फायदा गरीबांना कसा होईल जे पाहिले आहे. सरकार कुठे कमी पडले आहे असे वाटत नाही. अस गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे.

चीन आणि भारत सीमा प्रश्नावर देखील नितीन गडकरी यांनी वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी हा मुद्दा योग्य पद्धतीने हाताळला आहे. हा संवेदनशील मुद्दा आहे त्यामुळे याबाबत काहीही भाष्य करणार नाही. पंतप्रधान मोदी आणि राजनाथसिंह हेच योग्य ती माहिती देतील. तरीही सरकार सजग आहे. भारत हे सामर्थ्यशाली राष्ट्र आहे. प्रत्येक देशाबरोबर प्रेम आणि सौहार्दाचे संबंध असावे अशी आपली निती आहे. अस नितीन गडकरी म्हणाले आहे.

मला खुप आनंद आहे की माझी सर्वात मोठी ओळख ‘राजनिष्ठ’ अशीच…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!