मुंबई : राज्यावरील कोरोना संकटामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज ( १४ जून ) आपला वाढदिवस साधेपणाने कुटुंबीसोबतच साजरा करणार आहेत. ‘मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या, याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत’, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले..असे व्यंगचित्रकार..रसिक मनाचे राजकारणी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अस संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे.
वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले..असे व्यंगचित्रकार..रसिक मनाचे राजकारणी श्री. राज ठाकरे @RajThackeray यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
जय महाराष्ट्र pic.twitter.com/IfV32Cfac6— Sanjay Raut (@rautsanjay61) June 14, 2020
दरम्यान, राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील भावूक फेसबुक पोस्ट लिहून राज ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहे. बाळा नांदगावकर यांनी आपल्या पोस्टला ‘सुदामाचे राजधन’ अस नावं देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुदामाची ओळख ही जगाला कृष्णप्रेमा मुळे आहे, सुदामा आणि कृष्णाच्या मैत्रीचे दाखले हे हजारो वर्षे झाली तरी सातत्याने लोक अजून ही देत असतात. सुदामा कडे निखळ प्रेमाशिवाय कृष्णाला देण्यासारखे काहीच नव्हते, तरीसुद्धा भगवान कृष्णाचे सुदामा प्रेम हे सगळ्यात जास्त होते. मी सुद्धा आज राजकीय, सामाजिक, वैयक्तिक आयुष्यात जे काही आहे ते साहेबांमुळेच, माझ्याकडे सुद्धा साहेबांना देण्यासारखे म्हणजे माझी ‘निष्ठा’ जी मी कधीच अर्पण केली आहे. मला खुप आनंद आहे की माझी सर्वात मोठी ओळख ‘राजनिष्ठ’ अशीच आहे. अस बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.
मला खुप आनंद आहे की माझी सर्वात मोठी ओळख ‘राजनिष्ठ’ अशीच…
दरम्यान, साहेबांचा लाभलेला अनेक दशकांचा सहवास, वेळोवेळी त्यांनी दिलेले प्रेम, त्यांनी दाखवलेला मार्ग, या सर्व गोष्टी म्हणजे माझ्यासारख्या सुदामाचे ‘राजधन’. योगायोग असा ही आहे की साहेबांच्या निवासस्थानाचे नाव सुद्धा ‘कृष्णकुंज’च आहे. या लॉकडाउन मुळे साहेबांना या दिवशी राज्यभरातून शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या हजारो लोकांची या वर्षी ही प्रेमळ भेट होणार नाही व त्यामुळे सर्वांच्या मनात या वर्षी एकच ओळ नक्की असणार आहे. ‘साहेबा प्राण तळमळला’ पण हा दुरावा तात्पुरता असून साहेब आणि आपण सर्वजण मिळून लवकरच मार्गक्रमण करून जनतेच्या हिताचे काम करू. आज साहेबांच्या जन्मदिनी मी एकच सांगेन ‘तुम्हे और क्या दू मै दिल के सिवाय, तुमको हमारी उमर लग जाए’. अशा भावना व्यक्त करत बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंना शुभेच्छा दिली आहेत.
वाटून टाका म्हणणे सोपे आहे पण पैशाचे नाटक करता येत नाही – नितीन गडकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

