Share

अमित शहा याचं एक पाऊल मागे आता म्हणतात भाजप-सेना एकत्रच

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मित्रपक्ष सोबत न आल्यास ‘पटक देंगे’ म्हणणारे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आता एक पाऊल मागे घेत भाजप आणि शिवसेना विधानसभा-लोकसभा निवडणुका एकत्रच लढतील असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, लातूर येथे झालेल्या कार्यक्रमात अमित शहा यांनी . ‘मित्रपक्ष सोबत आला तर ठिक, नाही तो पटक देंगे’ अस वक्तव्य करत वाद ओढून घेतला होता.

विशेष म्हणजे देशात जे महागठबंधन होतंय, त्याचा फायदा भाजपलाच होईल, असा दावाही अमित शाहांनी केलाय. 2014 पेक्षाही जास्त जागा घेऊन एनडीए सत्तेत येईल, असं ते म्हणालेत. 2014 च्या निवडणुकीत एकट्या भाजपने 282 जागा जिंकल्या होत्या. तर एनडीएतील मित्रपक्षांसह हा आकडा साडे तीनशेच्या आसपास होता.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी मतदारसंघातूनच लढणार असल्याचंही अमित शाह यांनी स्पष्ट केलंय. नरेंद्र मोदींनी 2014 ला गुजरातमध्ये त्यांचा पारंपरिक मतदारसंघ आणि वाराणसी या दोन्ही मतदारसंघातून विजय मिळवला होता. यावेळीही ते बनारस म्हणजेच वाराणसीतून लढतील, असं शाह यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!