टीम महारष्ट्र देशा : ईडी व आयकर विभाग हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते असून पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अनुयायी आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश आहेत. तसेच अनेक माजी मंत्र्यावर निवडणुकीच्या तोंडावरचं आयकर विभागाचे छापे पडत आहेत. यावरून राजू शेट्टी यांनी मोदी-शहांवर टीका केली आहे.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर टाकलेला छापा उपद्रव देण्यासाठी टाकला असून मुश्रीफ मंत्री असताना छापा का टाकला नाही? निवडणुकीच्या तोंडावर छापे का टाकले हे न उलगडणारे कोडे आहे. तसेच ‘भाजपामध्ये जे कार्यकर्ते येत नाहीत, त्यांना ईडी व आयकर विभागाकडून त्रास दिला जातो. हे दोन्हो विभाग पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे निष्ठावान कार्यकर्ते असल्यासारखे काम करत आहेत, असा आरोप शेट्टी यांनी केला आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे कोल्हापुरातील कागल येथील मोठे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर आयकर विभागानं छापा टाकला होता. यावरून अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टीका केली होती. हसन मुश्रीफ या गोरगरिबांच्या नेत्याला इन्कम टॅक्सची भीती दाखवून सत्ताधारी त्रास देत आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली होती.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

