लातूर: विलास सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बाभळगाव गटातून ज्ञानोबा शेंडगे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने कारखान्याची संचालक मंडळ बिनविरोध आले आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख हे दोन मतदारसंघांतून बिनविरोध आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांनी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला.
निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या 21 संचालक मंडळांची ही निवडणूक होती. यात वीस मतदारसंघांत प्रत्येकी एकच अर्ज राहिला होता. बाभळगाव गटातून मात्र ज्ञानोबा शेंडगे यांचा एक अर्ज जास्त राहिला होता; पण या संचालक मंडळाची निवड बिनविरोध होईल असेच मानले जात होते. अखेर बाभळगाव गटातून ज्ञनोबा शेंडगे यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने या 21 संचालकांची निवड बिनविरोध झाली आहे. याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांनी केली आहे.
यात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख हे बाभळगाव ऊसउत्पादक सभासद गटातून व उत्पादक, बिगर उत्पादक, पणन संस्था मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले आहेत. महिला प्रतिनिधी गटातून वैशालीताई बिनविरोध निवडून आल्या आहेत.
इतर संचालकांत निवळी ऊसउत्पादक सभासद गटातून रवींद्र काळे, नारायण पाटील, बाळासाहेब बिडवे, शिराळा गटातून अनिल पाटील, अमर मोरे, रंजित पाटील, कासारजवळा गटातून अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गोविंद बोराडे, चिंचोलीराव वाडी गटातून सूर्यकांत सुडे, गुरुनाथ गवळी, गोविंद डुरे, बाभळगाव गटातून वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, अमृत जाधव, युवराज जाधव, उत्पादक, बिगर उत्पादक, पणन संस्था गटातून अमित देशमुख, महिला प्रतिनिधी गटातून वैशालीताई देशमुख, कुसुम कदम, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती गटातून भारत आदमाने, इतर मागासवर्गीय गटातून रामदास राऊत, विमुक्त जाती, जमाती, विशेष मागासप्रवर्गातून सुभाष माने हे बिनविरोध निवडून आले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

