Share

अमेय झळकणार हिंदी वेबसिरीजमध्ये

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मराठीचा युवा स्टार अभिनेता अमेय वाघ आपल्या चाहत्यांना एका मागून एक आश्चर्याचे धक्के देत आहे. काही दिवसांपूर्वी अमेयने सोशल नेटवर्किंग साईटद्वारे, लवकरच निगेटिव्ह भूमिकेतून झळकणार असल्याची माहिती दिली होती. या बातमीची चर्चा होत असतानाच, त्याने आणखीन एका नव्या प्रोजेक्टबद्दल सांगत त्याच्या चाहत्यांना खुश करून टाकलं आहे. ती बातमी म्हणजे, अमेय लवकरच एका सुप्रसिद्ध हिंदी वेबसिरीजमधून प्रेक्षकांसमोर येत आहे.

डिंग इंटरटेंटमेंट निर्मित आणि अनिरुद्ध सेन दिग्दर्शित ‘असुरा’ असे त्याचे नाव असून, वूट ऍपवर प्रदर्शित होणारी हि एक थ्रिलर गोष्ट आहे. विशेष म्हणजे, अमेयची यात महत्वपूर्ण भूमिका असून, तो पहिल्यांदाच अश्या थ्रिलर वेबसिरीजमध्ये काम करताना दिसून येणार आहे.

हिंदीच्या नावाजलेल्या कलाकारांचा समावेश असलेल्या या वेबसिरीजमध्ये बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीची प्रमुख भूमिका आहे.  ‘असुरा’ या वेबसिरीजच्या निमित्ताने अर्शदसोबत काम करण्याची संधी अमेयला मिळणार असल्याकारणामुळे, तो देखील खूप उत्सुक आहे. इतकेच नव्हे तर, नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेल्या या वेबसिरीजनंतर, अमेयकडे त्याच्या चाहत्यांसाठी आणखीन एक मोठे सरप्राईज आहे ! मात्र ते काय आहे, हे जाणून घेण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!