टीम महाराष्ट्र देशा: जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. पाक संसदेत झालेल्या गदारोळात काल पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतावर हल्ला करण्याची भाषा वापरली आहे. तर भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले आहेत. दरम्यान. पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई करण्याचा विचार देखील करू नये, पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई ऐवजी दहशतवादावर कारवाई करावी, असा थेट इशारा अमेरिकेतल्या डेमोक्रेटिक पक्षाच्या दोन प्रभावशाली खासदारांनी दिला आहे.
मोदी सरकारच्या कलम३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णयानंतर पाकिस्तानने निर्णयाचा निषेध केला आहे, पाकने भारतासाठी हवाई मार्ग बंद केला आहे. तसेच भारताच्या राजदूतांना जाण्यास सांगितले आहे. तर आपले देखील अधिकारी माघारी बोलावले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तडकाफडकी निर्णय घेत. इतर देशांना देखील हवाई मार्ग बदलण्याची नोटीस दिली आहे. तर काही विमानांना उंचीवरून उड्डाण करण्यास सांगितले आहे.
भारताने जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याच्या विरोधात पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे. पाकिस्ताच्या सिव्हिल एव्हिएशन ऑथॉरिटीद्वारे एक नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यानुसार ६ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान ही हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी बालाकोट एअर स्ट्राईक नंतर भारतासाठी हवाई मार्ग बंद करण्यात आला होता. मात्र तो कालांतराने खुला केला.
अजित पवारांच्या पाठोपाठ धनंजय मुंडेचीही जीभ घसरली, गिरीश महाजनांना म्हणाले ‘पिस्तुल्या’
अशोक चव्हाणांनी करून दिली मुख्यमंत्र्यांना राजधर्माची आठवण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

