Share

‘रुग्णवाहिका राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतूनच, खासदारांची यात कुठलीच भूमिका नाही’, आ. शिंदेंचे स्पष्टीकरण

Published On: 

नांदेड: लोहा व कंधार तालुक्यात श्रेयवादाची लढाई सूरु आहे, कारण तालुक्याच्या आरोग्य सेवेमध्ये नव्यानेच समाविष्ट झालेल्या नवीन रुग्णवाहिका या राज्य सरकारच्या राज्य आपत्कालीन निधीतून खरेदी करण्यात आल्या असून या नवीन रुग्णवाहिका खरेदीमध्ये केंद्र सरकार व खासदारांची कोणतीही भूमिका नाही. रुग्ण वाहिका खरेदीला केंद्र सरकारचा निधी मिळाला हे खासदार म्हणतात , खासदार हे मतदारसंघातील जनतेची दिशाभूल करत असल्याचे लोहा कंधारचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी सांगितले.

यावेळी शिंदे म्हणाले, लोह्यात या रुग्णवाहिकांचे लोकार्पण नुकतेच झाले. या रुग्णवाहिका राज्य सरकारच्या निधीतून मिळालेल्या असताना केंद्राने पुरविल्याची खोटी माहिती देत खासदार व विरोधक राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला, तसेच उथळपाण्याला खळखळाट फार असतो, आजपर्यंत त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काय दिवे लावले आहेत हे सर्व जनतेला माहित आहे. राजकारण करा पण बिनबुडाच्या वावड्या उठवू नका. मतदारसंघातील जनतेचा भरोसा आता तुमच्यावर राहिला नाही. माझ्यावर उठसूठ बिनबुडाच्या टीका करणाऱ्यांना मतदार संघातील जनता चांगल्या प्रकारे ओळखत आहे. मला उठसूठ राजकारण करायचे नाही, कोणावरही टीका टिपणी करायच्या नाहीत, मला लोहा-कंधार मतदारसंघातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा, शिक्षण,रोजगार, दळणवळण, कृषी विकास, व मतदारसंघातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करायचा असल्याचे आ. शिंदे म्हणाले.

कोरोनाच्या संकटात आ. शिंदे यांच्या निधीतून कापशी प्रा. आ. केंद्र, लोहा व कंधार येथे ३२ लाख रुपयांचा निधी रुग्णवाहिका खरेदीसाठी दिला. लोहा-कंधार मतदारसंघात कोरोनाच्या आपात्कालीन आमदार निधीतून ५० लाख रुपये दिले जाणार आहेत. त्यातून ऑक्सिजन, अधिकचे बेड, व्हेंटिलेटर व कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींचा साठा खरेदी केला जाणार आहे, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांना पीक विमा व अतिवृष्टीची मदत लवकरच मिळणार असून आपण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना खरीपाच्या पेरणीपूर्वी मदत मिळावी, अशा सूचना दिल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!