🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : औरंगाबाद येथील हर्सूल टी पॉइंट जवळ अपघातात जखमी अवस्थेत पडलेल्या दुचाकीस्वाराला आमदार अंबादास दानवे यांनी मदतीचा हात देत तातडीने रुग्णालयात दाखल केले. सदर अपघात गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास हर्सूल टी पॉइंट जवळ झाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, आमदार दानवे सहकाऱ्यांसह दुपारी साडेतीनच्या सुमारास हर्सूलकडून शहरात येत असताना टी पॉईंट जवळ रस्त्याच्याकडेला एक दुचाकीस्वार ( गाडी क्र.एम एच २० सिव्ही ७३८) अपघातग्रस्त झाला होता. जखमी अवस्थेत तो रस्त्याच्या कडेला पडलेला दिसला. रस्त्याने शेकडो वाहने ये-जा करीत होती. बघ्यांची गर्दी ही जमा झाली होती. मात्र जखमी तरुणाला मदत करण्यास कोणीही तयार नव्हते. ही बाब आमदार दानवे यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने गाडी थांबवत तरुणाकडे धाव घेतली.
समोरून जाणाऱ्या रिक्षाला थांबवून त्यांनी तातडीने जखमी तरुणास रिक्षात टाकले अन दवाखान्यात देण्याच्या सूचना केल्या. बघ्यांची गर्दी झाल्याने दानवे यांनी पोलिसांना फोन करीत वाहतूक सुरळीत करण्यास सांगितले. आमदार दानवे यांच्या सहकार्यामुळे सदर तरुणाचा जीव वाचेल, अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
रस्त्याच्या कडेला रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या तरुणाला पाहून मी लगेच गाडी थांबविली. बघ्यांची गर्दी हटवत तरुणाला रिक्षा टाकून दवाखान्यात नेण्याची सूचना कार्यकर्त्यांना केल्या. अपघातग्रस्तांना वेळीच मदत मिळाली तर जीव वाचू शकतो. आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत. जनसेवा हीच ईश्वरसेवा असे मी मानतो. त्यामुळे सर्वांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे यावे असे यावेळी आमदार दानवे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1197726181912539138?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1197724902096113665?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
