Share

अ‍ॅमेझॉनची राज ठाकरेंच्या विरोधात कोर्टात धाव; 5 जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश 

Published On: 

मुंबई :  महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अ‍ॅमेझॉन यांच्यात सुरु असलेला ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ वाद आता चिघळला आहे. आता हा वाद कोर्टात गेला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेला अ‍ॅमेझॉननं कायदेशीर नोटीस बजवली आहे.

अ‍ॅमेझॉननं राज ठाकरे यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. दिंडोशी कोर्टानं  या प्रकरणी राज ठाकरेंसह मनसे कामगार सेनेला नोटीस बजावली आहे. 5 जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे त्यांना आदेश देण्यात आले आहेत.

मध्यंतरी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने  अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांनी येत्या दिवसांत त्यांचं अॅप मराठी भाषेत सुरू करावं, नाहीतर त्यांचा मनसे स्टाइलमध्ये समाचार घेण्यात येईल, असा इशारा मनसेनं आधीच दिला होता.

ज्याप्रमाणे बंगळुरूस्थित दोन्ही अॅपनी दक्षिण भारतातील इतर भाषांना प्राधान्य दिलं, पण मराठीत अॅप सुरू केलं नाही. त्यांना महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असल्यास त्यांनी अॅपमध्ये मराठी भाषेचा पर्याय द्यावा, अन्यथा दोन्ही कंपन्यांचा मनसे स्टाईलने समाचार होईल. असा इशारा मनसे कडून देण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!