Share

अमरिंदर सिंग यांच्या घरात राहणारी ‘ती’ महिला कोण?; राज्य सरकारने दिले चौकशीचे आदेश

Published On: 

चंदीगड : पंजामध्ये सध्या मोठे राजकीय वादळ उठले आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सरकारी निवासस्थानी जवळपास साडेचार वर्ष त्यांची एक पाकिस्तानी मैत्रीण राहत होती. ही महिला कोण? आणि ती तीथे का राहत होती. याचे पाकिस्तातील आयएसआय या गुप्तचर संस्थेशी कथित संबंधाची चौकशी करण्याचे आदेश पंजाब सरकारने दिले आहेत.

अरुसा आलम असे या महिलेचे नाव आहे. ती संरक्षणविषयक पत्रकार असल्याचे सांगण्यात येत आहे. या महिलेशी कॅप्टर अमरिंदर सिंग यांचे खास संबंध होते. पंजाबला आयएसआयपासून धोका आहे असे अमरिंदर सिंग का सांगत आहेत, त्यांना याबाबत माहिती कोण देत आहे. याची आम्ही चौकशी करत आहोत, चौकशी होऊ नये, यासाठीच कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपाला मदत करत आहेत. असे पंजाबचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदी डावलल्याने व मुख्यमंत्री निवडीसाठी त्यांच्या मताचा पक्षश्रेष्टींनी विचार न केल्याने ते नाराज होते. त्यामुळे त्यांनी कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामाही दिला होता. त्यानंतर काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी त्यांची मानधरणी केल्यानंतर ते राजी झाले होते. मात्र काही दिवसांतच त्यांनी कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पुन्हा नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणामुळे पंजाब मध्ये मोठा राजकीय भूकंप झाला होता. आता पाकिस्तानी महिलेचे प्रकरण समोर आल्याने कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!