Share

फुलंब्रीतील दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या; तालुका व्यापारी महासंघाची मागणी

Published On: 

🕒 1 min read

फुलंब्री : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून शासनाच्यावतीने अनेक वेळा बाजारपेठा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु यात व्यापारी बंधुचे दुकाने बंद असल्याने उपासमारिची वेळ आली आहे. यासाठी पुâलंब्री तालुका व्यापारी महासंघाच्यावतीने तहसीलदार शितल राजपूत यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन गुरुवारी दि.८ देण्यात आले.

या निवेदनात असे म्हंटले आहे की, सध्या कोरोना महामारीच्या संदर्भात फुलंब्रीच्या बाजारपेठा बंद करण्यात आल्या असून आता यात व्यापारी वर्गाचे फार मोठे अर्थिक नुकसान होत आहे. तरीसुद्धा शासनाच्या दिलेल्या आदेशानुसार व्यापारी वर्ग विविध कर भरणे, बँकेचे व्याज भरणे, दुकानाचे भाडे देणे, कामगारांचे पगार देणे, जास्तीचे आलेले लाईट बिल भरणे, नगरपंचायतीचे मालमत्ता कर भरणे याचा प्रयत्न केला जात आहे.

शासनाकडून व्यापारी वर्गांना कोणत्याही प्रकारची अर्थिक मदत मिळाली नाही. शासनाच्या वतीने व्यापारी बांधवाची मन दुखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. बंद असलेल्या बाजारपेठाला व्यापा-यांचा विरोध असून यात व्यापारी वर्ग त्रस्त आहे, जनसामान्यांचे जिने मुश्किल झाले आहेत. याची दखल घेत बाजापेठा सुरळीत कराव्या अशी मागणी तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे. या निवेदनावर व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष सदाशिव तायडे, सराफा असोसिएशनचे शाम वानखेडे, नाभीक महासंघाचे संजय पंडित, वजन काट्याचे व्यापारी सुधाकर जेठे, भास्कर वानखेडे, कापड व्यापारी सरफराज पटेल यांच्यासह आदीच्या सह्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या    

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!