Share

‘युती करून चूक झाली आमच्याकडून, २०२४ च्या निवडणुकीची तयारी करा’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : ‘जे झाले ते झाले, चूक झाली आमच्याकडून, पुढे युती होणार नाही. आता पाच वष्रे पक्षाचे काम वाढवून २०२४ च्या निवडणुकीची तयारी करा, अशी सूचना रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. ते आढावा बैठकीत बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘यंदाच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची चांगली संधी भाजपकडे होती; परंतु राज्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन युती करावी लागली. गरज संपली की काही जण सोडून जातात, त्यामुळे दगाफटकाही झाला,’ असे म्हणत दानवे यांनी शिवसेनाला लक्ष केलं.

‘२०२४ साठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. चांगली ताकदवान माणसे पक्षात आणा. तुमच्या मनातील भावना माहिती आहेत. पुढे युती होणार नाही, असे रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले.

दरम्यान, राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेनेने विधानसभेचा निकाल लागल्यानंतर लगेचच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हवं अशी भूमिका बोलून दाखवली. मात्र या मागणीला भाजपने स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यामुळे भाजप शिवसेनेतील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला होता. यानंतर आता शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची एकत्रित सत्ता स्थापन करणार असल्याचे बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1195922581238321152?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1195920698134257664?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!