🕒 1 min read
ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी पुढे आली आहे. मेलबर्नमध्ये एका हॉटेलमध्ये जेवण करताना चाहत्याची भेट घेतल्याचे वृत्त समोर आल्याने पाच भारतीय खेळाडूंना एकांतवासात ठेवण्यात आले होते. तसेच त्यांना भारतीय आणि ऑस्ट्रेलियन संघापासून वेगळे करण्यात आले होते.
परंतु नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार पूर्ण भारतीय संघ आणि सहकारी कर्मचारी यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. बीसीसीआयने न्यूज एजन्सी एएनआयला माहिती आहे दिली की, ‘भारतीय संघातील सर्व खेळाडू आणि त्यांचे सहयोगी कर्मचारी यांची रविवारी (३ जानेवारी) कोविड-१९ साठी लागणारी आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीचे अहवाल पूर्णपणे निगेटिव्ह आढळून आले आहेत.’
BREAKING NEWS from BCCI:
Playing members of the Indian Cricket Team and support staff underwent a RT-PCR Test for Covid-19 on January 3, 2021. All tests have returned negative results. #AUSvIND— Chloe-Amanda Bailey (@ChloeAmandaB) January 4, 2021
Breaking All Indian players and support staff test negative. So matter closed I would say. @SportsTodayofc @IndiaToday
— Boria Majumdar (@BoriaMajumdar) January 4, 2021
चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने १-१ ची बरोबरी साधली आहे. सात जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना होणार आहे. त्यानंतर अखेरचा व चौथा कसोटी सामना हा ब्रिस्बेन येथे १५ जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे. सात जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना सिडनीमध्ये होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ब्रिस्बेनला जाण्याची टीम इंडियाची का इच्छा नाही ? जाणून घ्या
- “कसोटीपूर्वी भारतीय संघावर दबाव आणण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे हे वाईट कृत्य”
- मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेला सुरुहोण्यापूर्वीच घरघर
- “चंद्रकांतदादांचे पत्रलेखन हे उकळत्या किटलीतील रटरटत्या चहासारखे”, राऊतांचा टोला
- “जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी ही कोरोनावरील लस घ्यावी”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
