🕒 1 min read
मुंबई: विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट राजकारणात देखील अधिक चर्चिला जात आहे. हा चित्रपट म्हणजे कॉंग्रेसच्या काळात काश्मिरी पंडितांना सहन करावा लागणारा अन्याय, अत्याचार याचे वर्णन करणारा ज्वलंत इतिहास असल्याचे भाजपने म्हटले आहे. तर काँग्रेस तसेच इतर पक्षांनी या चित्रपटात सत्यता दडवण्यात आल्याचा आरोप केला आहे. हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा, अशी भाजपने अनेक राज्यांतील मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवरच शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut ) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.
झारखंड, छत्तीसगढ़ भाजपच्या टार्गेटवर आहेत. ज्या राज्याचे मुख्यमंत्री ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटास करमुक्त करणार नाहीत ते सर्व देशाचे दुश्मन असे या मंडळींनी ठरवून टाकले आहे! अशा मानसिकतेतून देशाला बाहेर काढणारे नेतृत्व विरोधी पक्षांत आहे काय? असेल तर त्यावर एकमताची मोहोर उठेल काय? ते घडणार असेल तरच ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेल्या एकजुटीच्या प्रयत्नास काही अर्थ आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
भाजपप्रणीत ‘एनडीए’ उरलेले नाही, पण काँग्रेसप्रणीत ‘यूपीए’ तरी आज कोठे दिसत आहे काय? यूपीएत नक्की कोण आहे व त्यांचे काय चालले आहे याबाबत शंका आहे. विरोधकांनी एकजुटीसाठी पाऊल पुढे टाकणे म्हणजे सर्वात आधी ‘यूपीए’चा जीर्णोद्धार करणे. ‘यूपीए’चा सातबारा सध्या काँग्रेसच्या नावावर आहे. त्यात बदल केल्याशिवाय विरोधकांची भक्कम एकजूट होणे शक्य दिसत नाही. शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, केजरीवाल, के. सी. रा, एम. के. स्टॅलिन हे सर्व तालेवार लोक आहेत व नव्या एकजुटीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा होणे आवश्यक आहे. यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला नाही म्हणून ममता बॅनर्जी यांना पुढे यावे लागले. त्यांनी ‘पुरोगामी’ शक्तींना साद घातली आहे. असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
‘त्या’ हिंसेवर पाणी टाकण्याऐवजी तेल ओतण्याचे काम भाजपवाले करतायेत; संजय राऊतांचा आरोप
“… तरच भाजपविरोधी आघाडीस बळ मिळेल व ‘यूपीए’चा जीर्णोद्धार शक्य होईल”,- संजय राऊत
IPL 2022: ”तो यंदा ६०० पेक्षा जास्त धावा करेल”, एबी डिव्हिलियर्सची विराटबाबत मोठी भविष्यवाणी!
IPL 2022 RCB vs KKR : कोलकाताची झुंज अपयशी; बंगळुरूचा हंगामातील पहिला विजय!
VIDEO: हसरंगाच्या गुगलीचा शेल्डन जॅक्सन ठरला बळी, चेंडू पडल्यानंतर कसा वळला ते तुम्ही पाहाच
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
