Share

सर्वच साखर कारखान्यांची कसून चौकशी व्हायलाच हवी; चंद्रकांत पाटलांची मागणी

Published On: 

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या साखर कारखान्यांच्या खरेदी-विक्रीत घोटाळे झाल्याच्या आरोपावरुन आयकर विभागाने छापेमारी केली. कारखान्यांची कसून चौकशी केली. अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या कंपन्यांवरही छापे टाकण्यात आले. या सर्व प्रकरणावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सर्व साखर कारखान्यांच्या खरेदी विक्रीची कसून चौकशी करायला हवी, अशी मागणी केली आहे.

सर्वच साखर कारखान्यांची कसून चौकशी व्हायलाच हवी. कारखान्यांची विक्री कमी किंमतीत झाली असल्याची तक्रार असल्यामुळे राज्य सहकारी बँक आणि बँकेचे संचालक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही चौकशी करायला हवी, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. अजित पवारांनी काल पुण्यात जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी विक्रीबाबत पत्रकार परिषद घेत माहिती दिली. मात्र फक्त जरंडेश्वर कारखान्याची चौकशी करा आणि उरलेल्या 64 कारखान्यांची चौकशी नको, अशी आमची भूमिका नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

जरंडेश्वर कारखान्याचे प्रकरण हे काळा पैसा पांढरा करण्याचे आहे. त्याची चौकशी ईडी करत आहे. उरलेल्या कारखान्यांचे प्रकरणही मनी लॉंड्रिंग असेल तर त्याचीही चौकशी करा. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार बाकीच्या कारखान्यांची विक्री कमी किमतीला झाल्याची तक्रार आहे. त्याची चौकशी करताना महत्वाची भूमिका असलेल्या राज्य सहकारी बँकेची आणि त्या बँकेचे संचालक अजित पवार यांची चौकशी करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!