Share

तळीरामांनो स्टॉक केला नसेल तर आता होणार तुमचे हाल बेहाल !

Published On: 

पुणे : गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. राज्य शासन आणि प्रशासनाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

राज्यात दररोज कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असून अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन व कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. दरम्यान, राज्यात रात्री आठ नंतर जमावबंदी लागू करण्यात आली असून मॉल्स, हॉटेल, चित्रपटगृहे व इतर दुकाने देखील रात्री आठच्या आधीच बंद करण्याचे आदेश राज्य शासनाने लागू केले आहेत.

मात्र शासन निर्णयाबाबत नागरिकांमध्ये कमालीचा गोंधळ पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने सुरु केलेल्या ‘मिशन ब्रेक द चेन’ मध्ये नक्की कोणते दुकाने सुरु राहणार आणि कोणते दुकाने बंद राहणार याबाबत नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. अशातच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ३० एप्रिल पर्यंत पुण्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. फक्त पुणेच नाही तर राज्यातील सर्वच ठिकाणी अशीच अवस्था आहे.

त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. नक्की काय सुरु काय बंद याबाबत गोंधळ असल्याने नागरिकांनी हव्या असणाऱ्या वस्तूंचा साठा करून ठेवला नाहीये. यामध्ये तळीरामाचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना काल ( ४ एप्रिल ) दारूची दुकाने सुरु असणार की बंद याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत निर्णय झाला नसून ‘टेक अवे’ सुविधा सुरु राहील असे उत्तर दिले होते. त्यामुळे तळीराम बिनधास्त होते. मात्र आता अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद असल्याने तळीरामांचे हाल बेहाल होणार आहेत हे नक्की.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!