Share

उद्या पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर, मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण राज्यात सध्या जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. पुण्यातही सध्या जोरदार पाऊस पडत त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहे.

याच पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना ५ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर केली आहे. पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शालेय विद्यार्थ्यांचे हाल होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.

दरम्यान, जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आणि जुन्नर या तालुक्यात अतिवृष्टी होत आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांना अतिवृष्टीचा त्रास होऊ नये, म्हणून सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले आहे.

पावसाचा मुंबईला दणका रस्ते लोकल वाहतूक ठप्प

शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीला युती सरकारच जबाबदार- पगार

‘उताऱ्यावर पोटखराब नोंद असलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान योजनेचा लाभ द्या’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!