करमाळा (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने जाहिर केलेल्या शेतकरी सन्मान योजनेतुन दरवर्षी सहा हजार रुपये मिळणार आहेत. मात्र ज्या भुमिहिन शेतकऱ्यांना सरकारने फॉरेस्ट क्षेत्र डिस फॉर्सेस्ट करुन दिली आहेत अशा शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर पोटखराब अशी नोंद केली आहे. ही नोंद असल्याने गोर गरीब शेतकऱ्यांना योजनेला मुकावे लागत आहे. त्यामुळे सरकारने या शेतकऱ्यांना सन्मान योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी शिवसेना माजी तालुका प्रमुख शाहुराव फरतडे यांनी केली आहे.
याबाबत फरतडे यांनी निवेदन काढले आहे. या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की, गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून या जमिन लाभार्थ्यांनी शासनाकडून मिळालेले क्षेत्र पोटखराब न ठेवता वहिवाटी खाली आणले असून त्याची सातबारा सदरी पिकपाणी नोंद होत आहे. शिवाय त्या क्षेत्राचा शासकिय महसुल कर शासनाकडे जमा होत आहे. तरी देखील शेती संदर्भातील कोणाताही शासकीय लाभा (उदा मोटार ,विहिर ,फळबाग ड्रिप )या शेतकऱ्यांना मिळत नाही. तसेच पोटखराब नोंद असलेल्या या शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान योजनेचा देखील लाभ घेता येत नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार चुकीचा असुन हा भुमिहीन ,गोरगरीब ,वंचीत घटक शेतकरी नाही का ?असा संतप्त सवाल फरतडे यांनी शासनाला केला आहे. त्यमुळे या शेतकऱ्यांना पंतप्रधान योजनेच्या सन्मान योजनेचा लाभ द्यावा अन्यथा तिव्र अंदोलन करु असा ईशारा फरतडे यांनी दिला आहे.
दरम्यान सरकाने वंचित घटकांना फॉरेस्टसच्या जमिनी दिल्या आहेत. पंरतु १९७० पासुन त्यावर पोटखराब अशीच नोंद आहे याचे रीसेटलमेंट करुन सदर जमिनी लागवडी योग्य असल्याची नोंद महसुल विभागच्या जमाबंदी आयुक्तांनी करणे गरजेचे आहे. जेणे करुन या शेतकऱ्यांना शेती संदर्भातील सर्व शासकीय योजनेचा लाभ घेता येईल.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
