मुंबई : पुणे, अमरावती, यवतमाळ, नाशिक अशा जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागू केले जात असताना राज्याबाबत उद्धव ठाकरे काही महत्वाचा निर्णय घेणार का ? याकडे सामान्यांचं लक्ष्य लागलं होतं. पुन्हा लॉकडाऊन होणार का ? यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘पुढील परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्रात दुसरी लाट आलीये का ? हे पुढच्या १० ते १५ दिवसांत समजेल. स्थानिक प्रशासनाकडे निर्णय सोपवले असून अचानक लॉकडाऊन केला जाणार नाही. पूर्वकल्पना दिली जाईल,’ असं सांगत जनतेमध्ये निर्माण झालेली भीती दूर केली आहे.
सद्या लॉकडाऊनची भीती टळली असली तरी नागरिकांनी मास्क वापरणे, हात धुणे, सुरक्षित अंतर पाळणे हे गरजेचे आहे. अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल व नामुष्कीने लॉकडाऊन करावा लागेल, असं भाष्य देखील उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम, आंदोलन, यात्रा यांना राज्यात काही दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तर, ‘पक्ष वाढवू, पण कोरोना नाही, पक्ष वाढवायचा आहे जरुर वाढवा, पण कोरोना नका वाढवू,’ असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राहुल गांधींना ‘हम दो, हमारे दो’ म्हणण्यासाठी आधी लग्न करावं लागेल’
- ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली नव्या मोहिमेची घोषणा
- महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे हे गृहमंत्र्यांनी सिद्ध करून दाखवावं; तृप्ती देसाईंच आव्हान !
- पूजाच्या वडिलांनी ‘हे’ सांगताच आल्या पावली परत फिरल्या तृप्ती देसाई
- काँग्रेसच्या जन आक्रोश रॅलीत ‘लैला मै लैला’चे लागले ठुमके
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
