नवी दिल्ली : कोरोना या जागतिक महामारीच्या काळामध्ये जगातील सर्च राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांना मोठा आर्थिक फटका बसल्याने मंदीच्या छायेत आहेत. याला भारतीय अर्थव्यवस्था देखील अपवाद नाही. आता अनलॉक प्रक्रीये दरम्यान अर्थव्यवस्था हळू हळू रुळावर येत आहे. सरकार देखील अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पावले उचलत आहे. मात्र सरकारला देखील मर्यादा असल्याच मत नुकतच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी व्यक्त केल होत. त्यांनी यंदाचा अर्थसंकल्प कसा असेल याबद्दल सुतोवाच केले होते.
या पार्श्वभूमीवर पंततप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व राजकीय पक्षांसोबत ३० जानेवारीला ऑनलाईन बैठक घेणार आहेत. त्यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे उदिष्ट समोर ठेवणार असल्याची माहिती संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील.
तर 1 फेब्रुवारीला बजेट सादर केले जाणार आहे. सत्राचे दोन भाग असतील. पहिला भाग 29 जानेवारी ते 15 फेब्रुवारी आणि दुसरा भाग 8 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत होईल. संसदीय कामकाज मंत्रिमंडळ समितीने (सीसीपीए) या तारखांची शिफारस केली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 29 जानेवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. अधिवेशनाच्या दुसर्;या भागात अर्थसंकल्पाच्या प्रस्तावांवर चर्चा होईल. यापूर्वी सरकारने कोरोनामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलावले नव्हते. CCPA ने म्हटले की, अधिवेशन काळात कोरोना विषाणूशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाईल.
महत्वाच्या बातम्या
- वीज तोडणी प्रकरणी ‘मातोश्री’बाहेर ठिय्या आंदोलनाचा आम आदमी पक्षाचा इशारा
- संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार करणं हीच स्वर्गीय बाळासाहेबांना खरी आदरांजली – अजित पवार
- चीनसाठी मोदींची विशेष पंतप्रधान आवास योजना आहे का? – राष्ट्रवादी
- बीएचआर घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई ! सुनील झंवर यांच्या मुलाला अटक
- अहमदनगर जिल्हा बँक निवडणूक: कर्डिलेंनी शक्तिप्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज

