Share

या कठीण काळात आम्ही कंगनाच्या सोबत ; भाजपचा कंगनाला जाहीर पाठिंबा

Published On: 

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतच्या जुहू येथील कार्यालयावर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. कंगनाच्या कार्यालयामधील तळमजल्यावर असणारं अनधिकृत बांधकाम तोडलं जात आहे. यानंतर कंगना रणौत भावुक झाली असून तिने ट्विटरवरून राज्य सरकारसह मुंबई महापालिकेवर घणाघात सुरूच ठेवला आहे.

कंगनाला सद्या सामोरे जावे लागत असलेल्या कठीण काळात सोबत असल्याची भूमिका भाजपचे दिग्गज नेते व खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी, ” कंगनाला विश्वास ठेवण्यास सांगा, तिच्या या कठीण काळात आम्ही सोबत आहोत” असे ट्विट स्वामींनी केले आहे.

आज कंगनाचे कार्यालय तोडले जात असून दुसऱ्या बाजूला काल तिच्यावर विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव आणला गेला. यासंदर्भात काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी कंगनाविरोधात हक्कभंग मांडला. कंगना ड्रग्ज घेत असल्याचे अभिनेता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन याने एका मुलाखतीत सांगितले होते . त्यामुळे कंगना ड्रग्ज घेत असल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी चौकशी मुंबई पोलिसांमार्फत केली जाणार आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या:-

कंगणाच्या मुंबईतीला ऑफिसवर महापालिकेचा हातोडा, महानगरपालिकेकडून कारवाई

कंगनाचा ऑफिसवर बीएमसीची कारवाई ; कंगनाकडून बाबर आणि पाकिस्तानशी तुलना

‘हे’ धाडस महाराष्ट्रात होते… आता धुर निघालाच पाहिजे ; नितेश राणेंची आक्रमक भूमिका

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!