Share

धोक्याची घंटा! कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ‘या’ जिल्ह्यातील ६१ गावात लॉकडाऊन

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर : राज्यातील बहुतांश भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. मात्र, नगर जिल्ह्यात मात्र सातत्याने पाचशेच्या वर रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील ६१ गावांमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. या गावांमध्ये आज सोमवारपासून १३ ऑक्टोबरपर्यंत कडक निर्बंध लागू राहणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

नगरच्या करोना बाधितांची संख्या पुण्यातील रुग्णालयांत वाढत असल्याची गंभीर दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेऊन नगरमध्ये तातडीने उपाययोजना करण्याचा आदेश नुकताच दिला आहे. यामध्ये सर्वाधिक २४ गावे संगमनेर तालुक्यातील आहेत. श्रीगोंदा नऊ, राहाता सात, पारनेर सहा, शेवगाव चार, अकोले व श्रीरामपूर प्रत्येकी तीन, कर्जत दोन तर कोपरगाव व पाथर्डी प्रत्येकी एका गावाचा समावेश आहे. जिल्ह्यातील प्रमुख देवस्थाने असलेल्या शिर्डी, शनिशिंगणापूर, मोहाटा देवी, मढी, राशीन, बुऱ्हाणनगर, केडगाव या गावांचा यात समावेश नाही, ही समाधानाची बाब आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या ६१ गावांमध्ये सर्व व्यवहार पूर्ण बंद करण्याचा, नागरिकांची ये-जा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गावांमध्ये अत्यावश्यक सेवा दवाखाने, मेडिकल, टेस्टिंग सेंटर वगळता इतर सर्व आस्थापना दुकाने, वस्तू विक्री सेवा ४ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे या आदेशात म्हटलेले आहे. गावातील लोकांना बाहेरगावी जाण्यास आणि बाहेरच्या लोकांना या गावात येण्यास बंदी राहील. विवाह आणि इतर कार्यक्रमांना बंदी आहे.

तर अंत्यविधी आणि दशक्रिया विधी २० लोकांच्या उपस्थितीत करता येईल. गावातील अंतर्गत आणि पर्यायी रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. मुख्य रस्त्यावरील गावांत फक्त पुढे जाणाऱ्या वाहनांनाच परवानगी देण्यात येणार आहे. बाहेरगावच्या लोकांना अशा गावात थांबता येणार नाही.यासोबत कंटेन्मेंट झोनचे सर्व निर्बंध लागू राहणार आहेत.

संगमनेरातील सर्वाधिक २४ गावे
संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी, शेडगाव, निमगाव जाळी, आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, पारेगाव बुद्रूक, पानोडी, शिबलापूर, बोटा, पिंपरणे, उंबरी, वेल्हाळे, खळी, देवगाव, घुलेवाडी, कोल्हेवाडी, वडगाव लांडगा, तळेगाव, घारगाव, चंदनापुरी, कनोली, निमोण, वडगावपान, सायखिंडी तर अकोले तालुक्यातील लिंगदेव, वीरगाव, परखतपूर ही गावे लॉकडाऊन करण्यात आलेली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!