Share

मोठी चूक केलीत आता परिमाण भोगण्यास तयार राहा , पंतप्रधानांनी पाकिस्तानला खडसावलं

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : गुरुवारी जम्मू- काश्मीर येथील पुलवामातील अवंतीपोरा येथे करण्यात आलेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यामध्ये आतापर्यंत सीआरपीएफच्या ४४ जवानांना आपले प्राण गमावावे लागले. या शहीदांचं वीरमरण व्यर्थ जाऊ देणार नाही असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त करत पाकिस्तानला फैलावर घेतलं आहे.

मोठी चूक केली आहात… आता त्याच तोडीची शिक्षा भोगण्यास तयार राहा, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अवंतीपोरा हल्ल्याचा निषेध केला आणि पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. नवी दिल्लीत माध्यांशी संवाद साधतेवेळी देशवासियांना संबोधित करत आणि हल्ला करणाऱ्या भ्याड पाकिस्तानचा उल्लेख करत या दुष्कृत्यात ज्यांचा सहभाग आहे त्यांना याची शिक्षा नक्की मिळणार असं त्यांनी खडसावून सांगितलं.

आता दहशतवादाला उलथून पाडण्यासाठीचटा लढा आणखी आवेगाने लढला जाईल असं म्हणत ही वेळ साऱ्या देशाने एकत्र येऊन परिस्थितीचा सामना करण्याची असल्याचं ते म्हणाले. मोदी सरकारची निंदा करणाऱ्यांची भूमिकाही आपल्याला मान्य असल्याचं म्हणत निदान सध्याच्या अतिसंवेदनसील घडीला राजकारण दूर ठेवावं अशी विनंती त्यांनी केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!