Share

मंत्रालयात स्वतः उपस्थित राहून अजितदादा ठेवत आहेत वादळ परिस्थितीवर बारकाईने लक्ष

Published On: 

मुंबई  – राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली तसेच बचाव व मदतकार्यासाठी पूर्वतयारीची माहिती घेतली.

सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.अजित पवार मंत्रालयात उपस्थित राहून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून राज्यातील वादळ परिस्थितीवर व्यक्तीश: लक्ष ठेवून आहेत. तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे असेही उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान,अरबी समुद्रावरचं टौक्टै चक्रीवादळानं आज सकाळी साडेआठच्या सुमारास अनपेक्षितपणे रौद्र रूप धारण केलं असून ते आता मुंबईलगतच्या समुद्रात दाखल झालं आहे. वादळ सध्या मंबईच्या किनाऱ्यापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असून ते स्वतःभोवती ताशी 180 ते 190 किलोमीटरच्या गतीनं घोंगावतं आहे. या वादळाची पुढे सरकण्याची गतीही आणखी वाढून ताशी 20 किलोमीटर झाली आहे.

गती वाढल्यामुळे टौक्टी वादळ आता आज रात्रीच पोरबंदर आणि महुआ दरम्यान गुजरातचा किनारा ओलांडण्याची शक्यता आहे. वादळाच्या प्रभावामुळे मुंबई, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पहाटेपासून वादळी वार्यांयसह सुरू झालेला मुसळधार पाऊस अजूनही सुरू असून आता पालघर मध्येही वादळी वारे आणि पावसाचा जोर वाढला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!