Share

प्रियंका चोप्राने तोडला लंडनमधील ‘कोविड’चा प्रोटोकॉल

Published On: 

लंडन : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असूनही अभिनेत्री प्रियांका चोप्रा बुधवारी लंडनच्या सॅलोनमध्ये गेली होती. तिच्यावर कोविड प्रोटोकॉल तोडल्याचा आरोप आहे. त्याचवेळी प्रियंका चोप्रा म्हणाली की, हे सगळ तिच्या आगामी चित्रपटासाठी आहे आणि या सर्व गोष्टींसाठी परवानगी घेण्यात आली होती .

अभिनेत्री प्रियंका चोप्रा लंडनमध्ये लॉकडाऊन असूनही बुधवारी सॅलोनमध्ये गेली होती. कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता यूकेमध्ये लॉकडाउन आहे. या कारणास्तव सॅलोन, स्पासारख्या वैयक्तक सेवा बंद आहेत. प्रियांका तिची आई मधु चोप्रा आणि पेट डॉग डायनाबरोबर सलूनमध्ये गेली होती .

तेव्हा सेलिब्रिटी स्टायलिस्ट जोश वुडही तिथे उपस्थित होते. मेट्रोपॉलिटन पोलिस प्रवक्त्याने मेट्रो डॉट कॉम यूके वेबसाइटशी बोलताना सांगितले – बुधवारी 6 जानेवारी रोजी 17:40 वाजता पोलिसांना सतर्क केले गेलेयानंतर, सॅलोनच्या मालकाला समज देण्यासाठी पोलिस सॅलोनमध्ये पोहोचले.

सरकारच्या परवानगी घेतल्यानंतर प्रियांका ने केस चित्रपटासाठी कलर केले आहेत सध्या ती लंडनमध्ये शूटिंग करत आहे. यूकेमध्ये फिल्म आणि टीव्ही निर्मितीस सुरू ठेवण्यास अनुमती आहे. आणि हे सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केले जाते. पोलिसांना तिने आपण सरकारची परवानगी घेतली आहे असे सांगितल्यावर ते समाधानी आहेत. प्रियंका चोप्रा हि पती निक जोनासबरोबर लंडनमध्ये आहे. ती तिचा आगामी चित्रपट टेक्स्ट फॉर यू चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडन मध्ये आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!