Share

Rohit Pawar | “शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राष्ट्रवादीने ताकद लावली तर…” ; रोहित पवारांचे सडेतोड उत्तर

Published On: 

अहमदनगर : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांकडून शिवतीर्थावर ऐतिहासिक दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरु आहे. ठाकरे गटाने यासाठी कंबर कसली असून शिंदे गट देखील यात मागे नाही. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मात्र ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले जात आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मदत घेतली असल्याचा दावा भाजपने केला आहे.

भाजपच्या या दाव्याला रोहित पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. राष्ट्रवादीने मेळाव्यासाठी ताकद लावली तर मैदानात जागा पुरणार नाही, असा टोला रोहित पवारांनी यावेळी लगावला. राष्ट्रवादीला ताकद लावण्याची गरजच काय? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. यावेळी बोलताना रोहित पवारांनी शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांच्याही दसरा मेळाव्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

दोघांचाही मेळावा मोठा व्हावा. मात्र 5 तारखेनंतर लोकांच्या हिताची कामे व्हायला हवीत आणि जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. एकनाथ खडसे भाजपमध्ये परत जातील का? यावर पवारांनी सांगितलं, “जेव्हा होईल तेव्हा बघूया. तो त्यांच्या जिल्ह्याचा प्रश्न आहे, राज्याचा नाही. कदाचित लोकांचं मन विचलित व्हावं यासाठी त्यांनी हे वक्तव्य केले असेल. त्यात काही तथ्य नसावं.”

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला बसेसमधून लोकं आणली जातील. पण शिवतिर्थावर होणाऱ्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात लोकं स्वत:हून येतील, असंही पवारांनी सांगितलं. शिवसेनेच्या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीने ताकद लावली तर मैदानात जागा पुरणारही नाही. पण शिवसेनेचीच ताकद एवढी आहे की त्यांच्या कार्यकर्त्यांमुळेच मैदानात जागा पुरणार नाही. स्वतःच्या हिंमतीवर ते ताकद लावून सभा घेत असतील तर राष्ट्रवादीला ताकद लावण्याची काय गरज? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | “आम्ही सत्तेत येऊन बसेल अन् तुम्हाला…”, अजित पवारांचा इशारा

Rahul Gandhi । राहुल गांधींचा पवार पॅटर्न, कर्नाटकात भर पावसात सभा गाजवली, भारत जोडो यात्रेतील Video

Raosaheb Danave | ‘भाजपशी युती नको’, म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांवर दानवेंचा हल्ला

IND | पहिले देश नंतर मी, विराटच्या निस्वार्थपणाचा पाहा VIDEO

Girish mahajan | एकनाथ खडसेंच्या ‘त्या’ विधानावर गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!