Share

एकनाथ खडसेंची घरवापसी?, देवेंद्र फडणवीसांच्या कानात म्हणाले… ; गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी पक्षाचे नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजप पक्षात जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशातच भाजप नेते गिरीश महाजन यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. नाशिक येथील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्या कानात एकनाथ खडसेंनी म्हटलेल्या गोष्टीचा महाजनांनी खुलासा केला आहे.

एकनाथ खडसे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट :

नाशिक येथील कार्यक्रमात एकनाथ खडसे मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येऊन भेटले. यावेळी फडणवीसांच्या कानात भेटुन मिटून टाकू, असं खडसे म्हणाले असल्याचा गौप्यस्फोट महाजानांनी केला आहे.

गिरीश महाजन यांचा गौप्यस्फोट :

यादरम्यान, काही दिवसांपुर्वी एकनाथ खडसे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला गेल होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या सून रक्षा खडसे देखील होत्या. यावेळी महाजनांना माहिती मिळताच त्यांनी रक्षा खडसे यांना फोन करुन माहिती घेतली असल्याचं महाजन म्हणाले.
अमित शहा यांच्या ऑफिस बाहेर आम्ही तीन तास थांबलो मात्र, शहांनी भेट नाकारली असल्याचं रक्षा खडसे यांनी महाजान यांना सांगितलं असल्याचा खुलासा गिरीश महाजन यांनी केला आहे.

दरम्यान, अमित शहा आणि एकनाथ खडसे यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती खडसेंनी दिली होती. या सर्व प्रकरानंतर एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. यावर आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचं स्पष्टीकरण खडसेंनी दिलं आहे. एवढंच नाही तर या भेटी बाबतची माहिती खडसेंनी शरद पवार यांना दिली होती, असं देखील खडसेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!