मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रोज नवे खुलासे सामोरे येत असताना आता या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. रिया चक्रवर्तीने सुशांतच्या बहिणीविरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
गन्हेगारी कट रचणे, फसवणूक करणे, बेकायदेशी कृत्य करणे, अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा यांसह कलम अशा एकूण 13 कलमांतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. सुशांतची बहिण प्रियांका, मितू आणि डॉक्टर तरुण कुमार यांच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
चीन सैन्याकडून लडाखमध्ये गोळीबार , भारतीय जवानांचे ड्रॅगनला चोख प्रत्युत्तर
सुशांतच्या आजाराची माहिती कुटुंबाना होती तरी देखील त्याबाबत सुशांतच्या कुटुंबीयांनी माहिती लपवली, डॉक्टररांच्या सल्ल्या शिवाय सुशांतला औषध देण्यात आली, अंमली पदार्थांचे सेवन करणे असे गंभीर आरोप रियाने आपल्या तक्रारीत केले आहेत. तसेच सुशांतची बहीण मितु सिंग ८ जुन ते १२ जून सुशांत साबोत असतानाच त्याची तब्ब्येत बिघडल्याचा आरोप रिया ने केला आहे. त्यामुळे रियाने या तिघांवर दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे.
‘आम्ही विचार केला हे त्यापेक्षाही खट्याळ’ , ‘नॉटी गर्ल’वरून अमृता फडणवीसांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

