Share

‘अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त राबवलेली ‘ती’ मोहीम आता तालुकास्तरावर कार्यान्वित करा’

Published On: 

बीड : दिव्यांग व्यक्तिंची तपासणी करून त्यांना अपंगाचे प्रमाणपत्र देण्याचे काम सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून सुरु आहे. मात्र जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून दिव्यांग विशेषतः अंध व्यक्तिंना जिल्ह्याच्या ठिकाणी अपंगाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी ये-जा करणे खूपच त्रासदायक ठरत आहे, त्यामुळे अपंगाचे बोर्ड तालुकास्तरावर कार्यान्वित करून उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयातून दिव्यांग व्यक्तिंना आवश्यक प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा मिळावी, अशी मागणी माजी आ.अमरसिंह पंडित यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै रोजी जिल्हा आरोग्य यंत्रणेने संकल्प निरोगी बीड हे अभियान यशस्वीपणे राबविले. या अभियानामध्ये एक दिवसासाठी अपंगाचे बोर्ड तालुकास्तरावर कार्यान्वित करण्यात आले होते. या संकल्पनेचा धागा पकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आ.अमरसिंह पंडित यांनी दिव्यांगांना आवश्यक प्रमाणपत्र मिळताना होत असलेल्या अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने अपंगाचे बोर्ड तालुकास्तरावर कार्यान्वित करण्याची मागणी केली.

दिव्यांग विशेषतः अंध व्यक्तिंना जिल्हास्तरावर येऊन जिल्हा रुग्णालयात नोंदणी करणे, तपासण्या करणे आणि तासंतास रांगेत उभा राहणे कठीण ठरते. ही अडचण लक्षात घेत पंडीत यांनी ही मागणी केली. दोन्ही मंत्री महोदयांनी याबाबत निर्देश दिल्याने हा विषय मार्गी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!